माघी एकादशीनिमित्त पंढरी दुमदुमली
By Admin | Updated: February 7, 2017 16:18 IST2017-02-07T14:57:51+5:302017-02-07T16:18:18+5:30
माघ एकादशीनिमित्त सावळ्या विठूरायांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पंढरी दुमदुमून गेली आहे.

माघी एकादशीनिमित्त पंढरी दुमदुमली
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ७ - माघ एकादशीनिमित्त सावळ्या विठूरायांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पंढरी दुमदुमून गेली आहे. पहाटेपासून विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे़
विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीमार्फत माघी एकादशी निमित्त प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ.विजय देशमुख यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठलाची नित्यपूजा करण्यात आली. तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा नायब तहसिलदार विलास महाजन यांच्या हस्ते करण्यात आली.
माघी एकादशीच्या नित्यपूजेस जिल्हाधिकारी तथा मंदीर समितीचे सभापती रणजीतकुमार, सहाय्यक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतुल कुलकर्णी, शहर पोलिस निरिक्षक विठ्ठल दबडे यांच्यासह मंदीर समितीचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पंढरपुरात येणारा भाविक चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेकडे जात आहेत. दर्शनरांगेत सहभागी होऊन अतिशय शांततेने विठूमाऊलीचा आणि ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत पददर्शनासाठी हळूहळू पावले टाकत पुढेपुढे सरकत आहेत़
सकाळपासूनच मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रस्ता, चौक ही ठिकाणांवरून वारकरी दर्शनासाठी मंदिर मार्गावर गर्दी केली आहे़ संत गजानन महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, संत कैकाडी महाराज मठ यासह अन्य मठातही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे़ मठ, धर्मशाळा, आश्रमशाळेत भजन, प्रवचन, किर्तनाचे सूर अजुनही आळवले जात आहेत़ एकूनच पंढरपूरात माघवारीनिमित्त पंढरी भक्तीमय झाली आहे़ काही वारकरी दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर लागली आहेत़ यात्रेमुळे एसटी विभागानेही जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
जिल्हा प्रशासनाचे ग्रेट वर्क
माघवारीनिमित्त पंढरपूरात येणाºया भाविकांचे हाल होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या मार्गदर्शनाखालील टिमने नेटके नियोजन केले. दर्शन रांगेत गर्दी होणार याची पूर्णपणे काळजी घेतली आहे. यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू याच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कोणत्याही वारक-यांची गैरसोय होणार नाही याबाबत जिल्हा प्रशासन व ग्रामीण पोलीस प्रशासन काम करीत आहे.