कर्नाटकातील बालकाने पळविले पंढरपूरकरांचे मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:26+5:302021-02-05T06:46:26+5:30
सतीश कळसकर (वय ३२, रा. अनिलनगर, पंढरपूर) हे दसऱ्यानिमित्त फूल खरेदी करण्यासाठी ८ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ६ च्या ...

कर्नाटकातील बालकाने पळविले पंढरपूरकरांचे मोबाईल
सतीश कळसकर (वय ३२, रा. अनिलनगर, पंढरपूर) हे दसऱ्यानिमित्त फूल खरेदी करण्यासाठी ८ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास गेले होते. त्यावेळी त्यांचा मोबाईल कोणीतरी चोरून नेला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या सूचनेनुसार प्रकटीकरण शाखेतील अधिकारी राजेंद्र गाडेकर यांचे पथक काम करत होते.
गुन्ह्यात गेलेला मोबाईल हा कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात ट्रेसिंग झाला. हा मोबाईल अल्पवयीन बालकाकडे सापडला. त्या बालकाची अधिक चौकशी करून त्याच्याकडून आणखी २० मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत. या २१ मोबाईलची एकूण किंमत २ लाख १७ हजार रुपये एवढी आहे. ही कारवाई शाखेचे पोसई राजेंद्र गाडेकर, पोहेकॉ. सुरज हेंबाडे, राजेश गोसावी, शरद कदम, बिपीनचंद्र ढेरे, पोना. गणेश पवार, इरफान शेख, शोएब पठाण, पोकॉ सिध्दनाथ मोरे, सुजित जाधव, संजय गुटाळ, समाधान माने, सुनील बनसोडे, अन्चर आतार (सायबर पोलीस ठाणे) यांनी केली.