दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडला अन् वैष्णवजनांतील उत्साह ओसंडून वाहात राहिला

By Appasaheb.patil | Published: June 25, 2023 02:52 PM2023-06-25T14:52:42+5:302023-06-25T14:52:53+5:30

मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माउलीच्या नामघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण अकलूज जवळील खुडूस फाटा (ता. माळशिरस) येथे पार पडले.

Pandharpur Wari Update: The second Gol Ringan ceremony was held and the enthusiasm of the Vaishnavas continued to overflow | दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडला अन् वैष्णवजनांतील उत्साह ओसंडून वाहात राहिला

दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडला अन् वैष्णवजनांतील उत्साह ओसंडून वाहात राहिला

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील

सोलापूर: पालखी सोहळा प्रमुखांनी इशारा करताच रिंगण सुरू झाले. अश्वाच्या धावण्याची गती पाहून वैष्णवजनांतील उत्साह ओसंडून वाहात राहिला. रिंगण सोहळा पार पडताच अवघा आसमंत माउलींच्या नामघोषाने दुमदुमला. यावेळी वारकरी मंडळींनी टाळ-मृदंगाचा गजर करीत अक्षरश: आनंद लुटला.  

हे चित्र होते माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा येथील. मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माउलीच्या नामघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण अकलूज जवळील खुडूस फाटा (ता. माळशिरस) येथे पार पडले. यावेळी हजारो वारकरी आणि भाविकांनी हा सुखद रिंगण सोहळा डोळ्यांत साठवला आहे.

यावेळी वारकरी मंडळींनी टाळ-मृदंगाचा गजर करीत अक्षरश: आनंद लुटला. स्त्री-पुरुष वारकऱ्यांनी झिम्मा फुगडय़ांचा खेळ मांडला. वारकऱ्यांनी उंचच्या उंच मनोरे उभे करून सर्वाचे लक्ष वेधले. टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर वारकऱ्यांनी फेर धरून उडय़ा मारत, नाचत आपला हा सोहळा अनुभवला आहे.

माळशिरस येथील मुक्काम आटोपून सोमवारी सकाळी माउलींच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे मार्गक्रमण होत असताना वाटेत खुडूस फाटय़ाजवळ दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडला. सकाळी आठ वाजताच पालखीचे  रिंगणस्थळावर आगमन झाले होते. संपूर्ण मैदानाला प्रदक्षिणा झाल्यानंतर मध्यभागी पालखी विराजमान झाली. नंतर पालखी सोहळा प्रमुखांनी इशारा करताच रिंगण सुरू झाले. अश्वाच्या धावण्याची गती पाहून वैष्णवजनांतील उत्साह ओसंडून वाहात राहिला. रिंगण सोहळा पार पडताच अवघा आसमंत माउलींच्या नामघोषाने दुमदुमला.

Web Title: Pandharpur Wari Update: The second Gol Ringan ceremony was held and the enthusiasm of the Vaishnavas continued to overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.