शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

Pandharpur Wari: वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी 'माऊली' सरसावली; पायी दिंडी सोहळ्यात फिरता मोफत दवाखाना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 3:03 PM

मुंबईतील दादर स्वामी समर्थ मठातून महाराजांच्या पादुंकासोबत माऊली ट्रस्टची डॉक्टर दिंडी निघते.

माळशिरस - मुखी हरिनामाचा जयघोष करत पांडुरंगाच्या दर्शनाची आस लावून वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. महाराष्ट्राला हजारो वर्षांची वारकरी परंपरा आहे. संत ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम महाराज पालखींसोबत राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या पंढरपूरला जात असतात. ऊन, पावसाची पर्वा न करता वारकरी पायी पंढरपूरला जात असतात. त्यात काही वारकऱ्यांना आरोग्याचा त्रास होतो तेव्हा मुंबईची 'माऊली' वारकऱ्यांच्या सेवेसाठी दरवर्षी पुढे सरसावते. 

वारी दिंडीच्या पालखी मार्गावर अनेक संस्था वारकऱ्यांची सेवा करतात. त्यातील एक म्हणजे मुंबईतील माऊली चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट. मागील ३१ वर्षापासून ही संस्था वारीत वैद्यकीय सेवा आणि औषधे मोफत पुरवत असते. ज्यामुळे वारकरी संप्रदायाने यासेवेला डॉक्टर दिंडी असं नाव दिलंय. वारीच्या सुरवातीलाच तज्ञ डॉक्टर आणि अनुभवी मेडिकल स्टाफ यांच्या उपस्थितीत भव्य असं मेडिकल कॅम्प आळंदी ते पंढरपूर येथील वारीच्या मार्गावर २२ ठिकाणी उभारले जातात. ज्यामध्ये मुंबई सह महाराष्ट्र आणि देशभरातील नामांकित असे ५०० पेक्षा जास्त डॉक्टर्स आणि सुसज्ज रुग्णवाहिका कार्यरत असतात. 

नैसर्गिक वातावरणामुळे वारकऱ्यांना पायी दिंडी सोहळ्यातून चालताना होणारे आजार, ताप, पाय दुखणे, कधी अपघात घडल्यास तातडीने छोटी शस्त्रक्रिया, श्वसनाचे आजार, हृदय रोग, नेत्र चिकित्सा अशा प्रकारे तातडीने माऊली ट्रस्ट डॉक्टर दिंडीमध्ये उपचार केले जातात. त्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे असणाऱ्या आठ रुग्ण वाहिका सदैव उपलब्ध असतात. इतकेच नाही तर सतत चालून वारकरी संप्रदाय यांच्या पायाला येणारी सूज, वेदना यावर माऊली ट्रस्टचे शेकडो स्वयंसेवक यांच्या हस्ते रोज पायाचे मसाज केले जातेय. 

सध्या माळशिरसमध्ये माऊली ट्रस्टकडून कॅम्प उभारण्यात आला आहे. उष्णतेमुळे पायाला फोड येतात, जखमा होतात, वयस्कर लोकांचे गुडघे दुखणे, किरकोळ अपघात, ब्लडप्रेशर, सुगर असणारे वारकरी या कॅम्पचा लाभ घेतात. या कॅम्पमध्ये रोज २५ डॉक्टरांची टीम असते. दरदिवशी साधारणपणे ३ हजार ते ५ हजार वारकरी या कॅम्पमध्ये उपचार घेतात अशी माहिती दिंडी प्रमुख डॉ. दीपक मोहिते यांनी दिली. 

माऊली ट्रस्टकडून वारकऱ्यांना मोफत अन्नदानमुंबईतील दादर स्वामी समर्थ मठातून महाराजांच्या पादुंकासोबत माऊली ट्रस्टची डॉक्टर दिंडी निघते. आळंदी ते पंढरपूर या मार्गावर ५ ठिकाणी वारकऱ्यांसाठी अन्नदान केले जाते. जेजुरी, वेळापूर, बंडी शेगाव, वाखरीला २ दिवस वारकऱ्यांना जेवण दिले जाते. 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी