शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

पंढरपूर, माळशिरसमधील ७६८७ लोक पुराने बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:57 IST

सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; रेस्क्यू पथकाची गरज नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी केले स्पष्ट

ठळक मुद्देवीर व उजनीचे पाणी भीमा नदीत सोडल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ७ पूल पाण्याखाली गेलेधोका टाळण्यासाठी या पुलाच्या बाजूने येणारा रस्ता बॅरिकेडिंगद्वारे बंद करण्यात आलामाळशिरस तालुक्यातील १९ पूल पाण्याखाली, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली

सोलापूर : वीर व उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील ४० गावांतील ७ हजार ६८७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

उजनी धरणातून सुमारे एक लाख क्युसेकच्या पुढे पाणी सोडण्यात आल्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका पोहोचला आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या ४४ गावांतील १८७८ कुटुंबांचे शाळा, मंदिर, सभामंडपात स्थलांतर केले आहे. पुरामुळे बाधित झालेल्या गावनिहाय नागरिकांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. पंढरपूर तालुका- सुस्ते: ४००, अंबाबाई पटांगण: १०९, पिराची कुरोली: १७५, व्यास नारायण झोपडपट्टी: १0३0, लखुबाई मंदिर परिसर: १0१२, पुळूज: ५३४, पुळूजवाडी: ५८, विटे: ३३२, खरसोळी: ७0, पोहेरगाव: ७३८, तारापूर: ५९, अजनसोंड: ८0, पटकुरोली: १६, खेडभोसे: ८६, देवडे: ६५, गुरसाळे: ९0, शेगाव दुमाला: ३४, भटुंबरे: १९, देगाव: १७३, कान्हापुरी: १७, कºहाळे: ८८, आव्हे: २२६, नांदोेरे: ५२, तरटगाव भोसे: २८२, शेळवे: ४२,खेडभाळवणी: ३२, चळे: २२८, आंबे: २१0, सरकोली: ३४0, वाडीकुरोली: १९0, होळे: २0५. अशा प्रकारे पंढरपूर तालुक्यातील ३१ गावांमधील १७४७ कुटुंबांतील ६९९२ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

वीर धरणातील पाण्यामुळे निरा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका पोहोचला आहे. यामध्ये माळशिरस तालुक्यातील ९ गावांतील १३१ कुटुंबांतील ६९५ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यामध्ये कुरभावी: १९, एकशिव: ६, पळसमंडल: ५५, कदमवाडी: २७, उंबरे: ११९, तिरवंडी: ८५, आनंदनगर: ८, अकलूज: ३५0, बिजवडी: २६.  उजनीतून भीमा नदीत पाणी सोडल्यानंतर नदीकाठच्या गावांना  सतर्क करण्यात आले आहे. पुराचा धोका असणाºया वाड्यावस्त्यांवरील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले  आहे.

अशी राबविली यंत्रणा- वीर व उजनीचे पाणी भीमा नदीत सोडल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ७ पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे धोका टाळण्यासाठी या पुलाच्या बाजूने येणारा रस्ता बॅरिकेडिंगद्वारे बंद करण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यातील १९ पूल पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दक्षिण सोलापुरातील १५ आणि अक्कलकोट तालुक्यातील १0 गावांत पूरस्थिती निर्माण झाली असून, या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा आदींची सोय संबंधित तहसीलदारांमार्फत करण्यात आली आहे. पुराच्या पाण्याने गंभीर हानी झाल्याचे एकही वृत्त नसल्याचे जिल्हा आपत्कालीन कक्षाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणfloodपूरwater transportजलवाहतूक