Pandharpur Election Results : अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट जप्त होणार, पंढरपुरात पराभव निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 12:39 PM2021-05-02T12:39:30+5:302021-05-02T12:40:18+5:30

Pandharpur Election Results : लोकसभा, विधानसभांसह इतरही निवडणुका लढवल्यामुळे आणि छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस' या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सातारकर अभिजीत बिचुकले हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उतरले होते.

Pandharpur Election Results : Abhijeet Bichukale's deposit will be confiscated, defeat in Pandharpur is certain | Pandharpur Election Results : अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट जप्त होणार, पंढरपुरात पराभव निश्चित

Pandharpur Election Results : अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट जप्त होणार, पंढरपुरात पराभव निश्चित

Next
ठळक मुद्देलोकसभा, विधानसभांसह इतरही निवडणुका लढवल्यामुळे आणि छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस' या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सातारकर अभिजीत बिचुकले हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उतरले होते

सोलापूर - राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक चुरशीची होत आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालातील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपाच्या समाधान आवताडेंमध्येच चुरस पाहायला मिळाली. एकूण 19 उमेदवार रिंगणात आहेत, पण इतर उमेदवारांना 19 व्या फेरीअखेर 1 हजार मतांचाही टप्पा पार करता आला नाही. तर, विशेष म्हणजे आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकले यांना केवळ 54 मतं मिळाली आहेत. नुकतेच हाती आलेल्या आकडेवाडीनुसार 25 व्या फेरी अखेर 6200 मतांची समाधान आवताडे यांना आघाडी मिळाली आहे.

लोकसभा, विधानसभांसह इतरही निवडणुका लढवल्यामुळे आणि छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस' या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सातारकर अभिजीत बिचुकले हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उतरले होते. बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बिचुकलेंनी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणात अचानक उडी घेतल्यामुळे येथील रंगत वाढली. तर, ही निवडणूक मीच जिंकणार, असा विश्वासही बिचुकले यांनी व्यक्त केला होता. मात्र, या निवडणुकीत त्यांना आपलं डिपॉझिटही वाचवता येत नसल्याचं दिसून येत आहे. 

पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या एकूण 36 फेऱ्या होणार आहेत. त्यापैकी, 19 व्या फेरीअंती आलेल्या आकडेवाडीनुसार भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांना 895 मतांची आघाडी आहे. त्यानंतर, पंढरपूर शहर व ग्रामीणचं मतदान संपलं असून मंगळवेढ्यातील गावाच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, 19 व्या फेरीपर्यंतच्या आडेवाडीनुसार अभिजीत बिचुकले यांना केवळ 54 मतं मिळाली आहेत. म्हणजे, बिचुकले यांना तीन आकडीही संख्या गाठता आली नाही. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शैला गोडसे यांनाही फक्त 800 मतं मिळाली आहेत. त्यामुळे, केवळ भाजपाचे आवताडे आणि महाविकास आघाडीचे भालके यांच्यातच चुरशीची लढत असल्याचे दिसून आले. दरम्यान, 25 व्या फेरी अखेर 6200 मतांची समाधान आवताडे यांना आघाडी


19 व्या फेरीअखेर मतदानाची आकडेवाडी

आवताडे - ५५५५९
भालके - ५४६६४
सिद्धेश्वर आवताडे - २०७
शैला गोडसे - ८००
सचिन शिंदे - ४८०
अभिजीत बीचुकले - ५४
आता पर्यंत मोजलेली मते - ११५४०२
 

Web Title: Pandharpur Election Results : Abhijeet Bichukale's deposit will be confiscated, defeat in Pandharpur is certain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.