माळशिरसमध्ये ‘सौ’साठी ‘श्रीं’ची झाली पंचायत
By Admin | Updated: January 24, 2017 20:30 IST2017-01-24T20:30:58+5:302017-01-24T20:30:58+5:30
माळशिरसमध्ये ‘सौ’साठी ‘श्रीं’ची झाली पंचायत

माळशिरसमध्ये ‘सौ’साठी ‘श्रीं’ची झाली पंचायत
माळशिरसमध्ये ‘सौ’साठी ‘श्रीं’ची झाली पंचायत
माळशिरस - आॅनलाईन लोकमत
माळशिरस पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या महिलांसाठी जिल्ह्यात सर्वाधिक जागा असलेला तालुका आहे़ जिल्हा परिषदेच्या ११ पैकी तब्बल ९ जागा महिलांसाठी आहेत तर पंचायत समितीच्या २२ पैकी ११ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत़ आता सभापतीपद सर्वसाधारण झाल्याने आणखी काही जागांवर महिला उमेदवार निवडणूक रिंगणात पाहावयास मिळतील़ त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक महिला उमेदवार माळशिरस तालुक्यात दिसतील़ परिणामी ‘सौ’साठी उमेदवारी गेल्याने तालुक्यातील दिग्गज ‘श्रीं’ची चांगलीच पंचायत झाली आहे़
सध्या महिलांची सर्व क्षेत्रात आघाडी असली तरी ग्रामीण भागातील महिला राजकीय क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक नसतात. कमी शिक्षण, वक्तृत्वाचा अभाव, कौटुंबिक समस्या अशा अनेक कारणांमुळे स्वयंस्फूर्तीने या क्षेत्रात येणाऱ्या महिलांची संख्या नगण्य अशीच आहे; मात्र बदलत्या काळानुरुप राजकारणात महिलांनाही ५० टक्के आरक्षण झाल्याने आता महिलाही राजकारणात येत आहेत़
-------------------
कोण कोठे जाणार?
४माळशिरस तालुक्यात राजलक्ष्मी माने -पाटील, रुपाली बेंदगुडे, शुभांगी देशमुख, श्रीलेखा पाटील, फातिमा पाटावाला, स्वरुपाराणी मोहिते-पाटील या महिलांची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा असते़ आता तालुक्यात सर्वाधिक जागा महिलांसाठी असल्याने यातील कोण कोठे जाणार? याबाबतही उत्सुकता आहे़ शिवाय त्या पुन्हा राजकीय आखाड्यात उतरणार का? कोण नव्या महिला राजकारणात पाऊल ठेवणार? काही सरपंच महिलांना संधी मिळणार का? कोण जाणार झेडपीत ? कोण होणार सभापती? अशा अनेक प्रश्नांवर सध्या गावोगावच्या शेकोटीवर गप्पा रंगताना दिसत आहेत़
-------------------
महिलांमुळे ‘अच्छे दिन’ ची अपेक्षा
४माळशिरस तालुक्यात अनेक वर्षांपासून अनेक महिलांना राजकीय वारसा लाभलेला आहे़ महिला अधिक कार्यक्षम असतात. कामात शिस्तबद्धता, वेळेचे नियोजन, कामातील सातत्य अशा अनेक गुणांमुळे महिलाराज असणाऱ्या तालुक्याला राजकीय सुसुत्रता येऊन ‘अच्छे दिना’ची अपेक्षा आहे़