शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

सोलापूर जिल्हा दौºयावर असलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्यांनी मार्डी येथे घेतला हुरडा पार्टीचा आस्वाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 12:30 IST

सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आलेल्या पंचायत राज समितीने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मार्डी येथे भारतीय जनता पाटीर्चे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या शेतात शिवार फेरीचे औचित्य साधून हुरड्याची चव चाखली.

ठळक मुद्देराजेशाही थाटात राज्यातील विविध भागातून आलेल्या आमदारांनी रानमेव्यावर मनसोक्त ताव मारलाआमदारांना सोलापूरी चादर भेट देऊन स्वागत केले. 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९  : सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आलेल्या पंचायत राज समितीने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मार्डी येथे भारतीय जनता पाटीर्चे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या शेतात शिवार फेरीचे औचित्य साधून हुरड्याची चव चाखली.राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांचे आग्रहाचे आमंत्रण स्विकारुन नियोजित शासकीय कामकाजात विस्कळीतपणा येऊ नये, यासाठी वेळेचे बंधन कटाक्षाने पाळत सकाळच्या पहिल्या प्रहारात शुक्रवारी पंचायत राज समितीने मार्डी येथे भारतीय जनता पाटीर्चे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या शेतात डेरेदाखल झाली. आणि राजहंस या प्रसिद्ध असलेल्या हुरड्याची मनसोक्त मेजवाणी घेतली.    भव्य शामियाना...गाद्या आणि लोड समोर हुरडा भाजण्यासाठी पेटविलेल्या चार आकट्या...उभ्या महाराष्ट्रात हुरड्यासाठी खवय्यांच्या पसंदीत उतरेला राजहंस या वाणाचा हुरडा सोलापूरची प्रसिद्ध शेंगाचटणी, फरसाणा, लसूण घालून केलेले शेंगाचे कूट, गुळाचे खडे सोबतीला नान्नजची प्रसिद्ध द्राक्षं, अशी तोंडी लावण्यासाठी प्लेटमध्ये मांडलेली आरास अशा राजेशाही थाटात राज्यातील विविध भागातून आलेल्या आमदारांनी रानमेव्यावर मनसोक्त ताव मारला. त्यानंतर हुरडा सुकरपणे पचावा, यासाठी अट्टहास करुन बनविलेल्या मठ्ठयाचाही फुरका सा-यांनी मारला. न्याहरीची वेळ असल्यामुळे पवार बंधुंनी सेट डोसा पेपर डोसा,उपमा,जामून सोबतीला फ्रूट सॅलेट, असा न्याहरीला बेतही होता.    पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे,बाशीर्चे आमदार दिलीप सोपल, पंढरपूरचे आमदार भारत भालके, आ.सुरेश खाडे, चरण वाघमारे, राहुल बोंद्रे, राहुल मोटे, विरेंद्र जगताप,आर.टी. देशमुख, सुधाकर भालेराव, दत्तात्रय सावंत असे आकरा आमदार या शिवार फेरी आणि हुरड्याच्या मेजवाणीत सहभागी झाले होते. ना.सुभाष देशमुख,शहाजी पवार, मनीष देशमुख, इंद्रजीत पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष काशीनाथ कदम, युवा मोचार्चे तालुकाध्यक्ष संभाजी दडे, कमलाकर माने, माडीर्चे उपसरपंच युवराज पवार,संजय इनामदार, कदीर कुडले, गणेश पवार यांनी आमदारांना सोलापूरी चादर भेट देऊन स्वागत केले. 

टॅग्स :Solapurसोलापूरpanchayat samitiपंचायत समिती