शेतात बांधलेली बैलजोडी अन् गाय चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:57+5:302021-09-02T04:47:57+5:30
फिर्यादीत म्हटले आहे की, २९ ऑगस्टला रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दोन बैल व गावरन गायी, असे विठ्ठल गावडे ...

शेतात बांधलेली बैलजोडी अन् गाय चोरीला
फिर्यादीत म्हटले आहे की, २९ ऑगस्टला रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दोन बैल व गावरन गायी, असे विठ्ठल गावडे यांच्या शेतात बांधून पत्नी व मेव्हणा महेश गरड, असे माझी मुलगी संध्या हिला पाहुणे बघण्यासाठी बारामती येथे गेलो होतो. संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास जेऊर येथे होतो. त्यानंतर गावडे यांच्या शेतात बांधलेली दोन बैल व गायी यांना पाणी व चारा टाकण्यासाठी शेतात जाऊन त्यांना पाणी चारा टाकून घरी आलो होतो. त्यानंतर ३० या तारखेला सकाळी ६ वाजेच्या सुमारास घरातून शेतात गेलो. तेव्हा बांधलेल्या ठिकाणी गावरन दोन बैल व एक गावरन गाय दिसून आली नाही. ही बाब इतर लोकांना सांगितली. त्यानंतर मी व मेव्हणा दोघांनी आजूबाजूला शोध घेतला असता मिळून आली नाहीत. कोणातरी अनोळखी चोरट्याने चोरून नेली आहेत.
........
सीसीटीव्हीत टेम्पोमधील जनावरे कैद
एका टेम्पोत जनावरे घेऊन जात असल्याचा प्रकार एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यातून संशयित आरोपीपर्यंत लवकरच पोलीस पोहोचतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. चोरीस गेलेल्या दोन बैल ४० हजार रुपये व २० हजाराची एक गावरन खिल्लारी गाय, अशी अंदाजे ६० हजार रुपयांची जनावरे चोरीला गेली आहेत.