ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
एनटीपीसीच्या निधीतून उजनी ते सोलापूर अशा जलवाहिनीसाठी ८१ किलोमीटर अंतरात पीसीसीपी (प्रीस्टेटेड कॉन्ट्रॅक्ट सिमेंट पाईप) पाईप वापरण्यास शुक्रवारी मनपाच्या पदाधिकाºयांनी मान्यता दिली. ...
पंठरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील पुरातन दगडी बांधकामाचे शास्त्रीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागातर्फे मंदिर संवर्धनाचे काम सुरू झाले. ...