आता मनोमीलन करू, असे दोघा मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी वरून दोस्ती, आतून कुस्ती असेच चित्र पाहावयास मिळेल, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अॅड. यु. एन. बेरिया यांनी पत्रकार परिषदेत केला. ...
ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेस उद्या शुक्रवार दि. १२ जानेवारीपासून प्रारंभ होत असून, ‘श्री’नी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक घालण्यासाठी नंदीध्वजांची मिरवणूक सकाळी ८ वाजता बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यातून निघणार आहे. ...
मनपातील गटबाजीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत वर्षा निवासस्थानावर दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत केलेल्या फटकेबाजीचा परिणाम लागलीच दिसून येत आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांना मी ब्राह्मणच मानतो. त्या काळच्या विद्वानांनी जर बाबासाहेबांना संस्कृत शिकविले असते; तर ते दुसरे शंकराचार्य झाले असते, असे विधान आज भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी आज येथे केले. ...
शेतीसाठी आज गुरुवारपासून उजनी धरणाचे पाणी कालव्यातून सोडण्याचा निर्णय मुंबईत बुधवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे रब्बी पिकांना पाणी मिळणार असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. ...
हद्दवाढ भागातील १४ गावांचा समावेश करूनच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गण निश्चिती करण्यात येणार आहे. एकूण १५ गणांची निश्चिती होईल. आरक्षणाची लॉटरीही दोन दिवसात काढली जाईल. ...
पाणी फाउंडेशनच्या वतीने तिसºया वॉटरकप स्पर्धेसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज व भागाईवाडी येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून वॉटरकप स्पर्धेत भाग घेतलेल्या जिल्ह्यातील काही तालुक्यातील तसेच मराठवाड्यातील काही गावच्या प्रतिनिधींना येथे प् ...
शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेस १२ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून त्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच यात्रेच्या ठिकाणी १४ फिक्स पॉर्इंटचे नियोजन करण्यात आले ...