शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील साखर कारखाने उभारणार ऑक्सिजन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:24 IST

श्रीपूर : गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साखर कारखान्यांनी सॅनिटायझरची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली. किमती स्थिर राहिल्या. आता ...

श्रीपूर : गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साखर कारखान्यांनी सॅनिटायझरची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली. किमती स्थिर राहिल्या. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवत आहे. साखर कारखान्यातील सहवीजनिर्मिती व आसवानी या प्रकल्पामधून मेडिकल ऑक्सिजन निर्मिती करता येईल असे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यानुसार सर्व कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आल्याची माहिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर ऑफ जनरल शिवाजीराव देशमुख यांनी दिली.

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे.

यापूर्वी बहुतांश आपत्कालीन परिस्थितीत साखर कारखान्यांनी मदत केली आहे. सद्यस्थिती लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी असे निर्देशित केले आहे की, ज्या कारखान्यांचा गळीत हंगाम अद्याप चालू आहे आणि ज्यांचा सहवीजनिर्मिती व आसावनी प्रकल्प कार्यरत आहे अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी व ज्या कारखान्याचा गाळप हंगाम संपलेला आहे, अशा कारखाना त्यांनी त्यांच्या कार्यक्षमतेसाठी ऑक्सिजन किटचा पुरवठा रुग्णांना अथवा कोविड सेंटरला करावा. सध्या कोरोना परिस्थिती ही भयानक असून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे. राज्य शासन व केंद्रशासन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तथापि सर्व साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

---

साखर कारखान्यांना कसा बनविता येईल ऑक्सिजन

साखर कारखान्यांच्या असावनी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुद्ध करण्याचा आणि कार्बन डायऑक्साइड वेगळा करण्याचा अनुभव आहे. त्याकरिता फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारायचा आहे. ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करायचा झाल्यास त्यासाठी वाफ व विजेची गरज भासते. यासंदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्विंग ॲड्रसोंप्शन प्रोसेसिंग या प्रकल्पानुसार कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारावे. यासाठी कारखान्यांनी सध्याची साधनसामग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल. त्यामुळे प्रकल्पाचा खर्चसुद्धा कमी होईल, असे शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.

--

पांडुरंग कारखाना ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्यास विचाराधीन

ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा अभ्यासपूर्वक काम चालू आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे प्रोजेक्ट टाकावा लागतो. ऑक्सिजन प्रकल्पही दोन प्रकारचा असतो. एक लिक्विड स्वरूपात घेऊन ऑक्सिजन तयार करणे व दुसरा वातावरणामधून ऑक्सिजन घेऊन तयार करणे हे प्रकल्प चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते, जोपर्यंत कारखाने चालू आहे. तोपर्यंत ऑक्सिजन प्रकल्प चालवणे. आर्थिकदृष्ट्या कारखान्यांना परवडेल. हा प्रकल्प उभारण्यासाठी चार ते पाच महिने जातात. पांडुरंग कारखाना हा प्रकल्प उभा करण्यास विचाराधीन आहे.

- डॉ. यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक, पांडुरंग कारखाना श्रीपूर