शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

भाजप नेत्यांची वाहने बाहेर; राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाड्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 14:34 IST

विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोलापूर शहर पोलिसांनी कशी काय नियमात सूट दिली, अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बराच काळ रंगली होती. 

ठळक मुद्देमाढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गाडी पोलिसांनी थेट निवडणूक कार्यालयापर्यंत सोडली

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गाडी पोलिसांनी थेट निवडणूक कार्यालयापर्यंत सोडली. यामुळे सत्ताधारी भाजपचे नेतेही काहीकाळ दचकले. विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना पोलिसांनी कशी काय नियमात सूट दिली, अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बराच काळ रंगली होती. 

लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले उमेदवार, नेते आणि कार्यकर्ते यांची वाहने जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या १०० मीटर दूर अडविली जात आहेत़ पोलिसांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ एक बॅरिकेड्स लावले आहे. याच ठिकाणी सर्व नेत्यांच्या गाड्या थांबविल्या जात आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिवसेनेच्या आमदार नीलम गोºहे वाहने घेऊन आले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांची वाहने बॅरिकेड्सजवळ थांबविली.  हे नेते चालत निवडणूक कार्यालयाजवळ आले. 

मात्र सोमवारी माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांची गाडी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सोडण्यात आली होती. शरद पवार आणि माझी भेट झाली. मी पवारांकडून माझ्यासाठी शुभेच्छा घेतल्या. मी केवळ अर्ज दाखल केला आहे, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

पवारांनी पाळला प्रोटोकॉल- शरद पवार आणि संजय शिंदे निवडणूक कार्यालयात आले तेव्हा सहकारमंत्री सुभाष देशमुख निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे अर्ज दाखल करीत होते. देशमुख आत आहेत, असे सांगितल्यानंतर पवारांनी आत जाण्यास नकार दिला. त्यांचा उमेदवारी अर्ज भरुन होऊ द्या, त्यानंतर आपण जाऊ, असे म्हणत ते कार्यालयाबाहेरील खुर्चीवर बसले. बाहेर आल्यानंतर सुभाष देशमुखांनी शरद पवार यांना नमस्कार केला. यानंतर पवार आत गेले. 

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढाSharad Pawarशरद पवारSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस