शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सोलापूर जिल्ह्यात कर्जमाफीच्या यादीतून ३८ हजार शेतकरी बाहेर, जिल्हा मध्यवर्ती बँक : बँक व शासन लावतेय निकषाची चाळण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 12:31 IST

कर्जमाफीसाठीच्या ‘यलो’ व मिसमॅच(विसंगत) यादीतील ५८ हजार १५१ पैकी ३७ हजार ८५७ शेतकरी शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी अपात्र झाले आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत जिल्हा बँकेला तीन प्रकारच्या दोन लाख ६५ हजार ९४ शेतकºयांच्या याद्या ग्रीन यादीत ९५ हजार १७९ शेतकरी बसले असून हे सर्व शेतकरी कर्जमाफीला पात्र झाले ग्रीन यादीतील बँकेने त्रुटी पूर्ण केलेल्या २८ हजार ३७० शेतकºयांची यादी शासनाकडे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ७ : कर्जमाफीसाठीच्या ‘यलो’ व मिसमॅच(विसंगत) यादीतील ५८ हजार १५१ पैकी ३७ हजार ८५७ शेतकरी शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी अपात्र झाले आहेत.  आॅनलाईन अर्ज भरलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोन लाख ६५ हजार ९४ शेतकºयांपैकी ओटीएस (दीड लाखावरील थकबाकीदारासह) एक लाख १४ हजार ४७३ शेतकरी बँकेने कर्जमाफीसाठी पात्र केले असले तरी शासनाच्या तपासणीत ही संख्या कमी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जिल्हा बँकेला तीन प्रकारच्या दोन लाख ६५ हजार ९४ शेतकºयांच्या याद्या आल्या आहेत. यापैकी ग्रीन यादीत ९५ हजार १७९ शेतकरी बसले असून हे सर्व शेतकरी कर्जमाफीला पात्र झाले आहेत. यापैकी ५१ हजार ७७५ शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने हे शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. त्यानंतर बँकेला ‘यलो’ यादी आली. या यादीच्या बँकेने केलेल्या तपासणीत ३२२४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झाले असून ६ हजार ९१६ शेतकरी अपात्र झाले आहेत. आता पात्र झालेल्या शेतकºयांची यादी शासनाकडे गेली असून या यादीच्या शासनाच्या तपासणीत पुन्हा पात्र किंवा अपात्र अशा दोन याद्या होणार आहेत. शासनाने पुन्हा मिसमॅच (शेतकºयांची आॅनलाईन अर्जात भरलेली माहिती व बँकेकडील माहिती विसंगत) च्या दोन याद्या दिल्या असून पहिल्या यादीत ४७ हजार ११ व दुसºया यादीत १० हजार ६०७ शेतकºयांची नावे आहेत. पहिल्या ४७ हजार ११ शेतकºयांची बँक पातळीवर तपासणी झाली असून त्यापैकी १६ हजार ७० शेतकरी पात्र तर ३० हजार ९४१ शेतकरी अपात्र झाले आहेत. --------------------शासनाच्या चाळणीतून पात्र किती?- ग्रीन यादीतील बँकेने त्रुटी पूर्ण केलेल्या २८ हजार ३७० शेतकºयांची यादी शासनाकडे गेली आहे. या यादीतील शेतकरी शासन पातळीवर पात्र की अपात्र हे शासनाकडून समजले नाही कारण यादीही परत आली नाही व पैसेही आले नाहीत. - त्यानंतर ‘यलो’ यादीतील १० हजार १४० पैकी बँकेच्या तपासणीत पात्र झालेली ३२२४ शेतकºयांची यादी शासनाकडे गेली असून यावरही शासनाने कळविले नाही. - मिसमॅच यादीतील बँकेने पात्र केलेली १६ हजार ७० व उर्वरित १० हजार ६०७ शेतकºयांच्या यादीच्या तपासणीत पात्र होणारी यादी शासनाकडे जाणार आहे. - यलो व मिसमॅच यादीतील पात्र शेतकºयांच्या शासन पातळीवरील चाळणीतून किती शेतकरी पात्र होणार?, हे सांगणे कठीण आहे.- यलो यादीतील ६ हजार ९१६ व मिसमॅच यादीतील सध्या झालेले ३० हजार ९४१ व उर्वरित १० हजार ६०७ शेतकºयांच्या तपासणीत अपात्र होणाºया शेतकºयांना विभागीय व जिल्हास्तरीय समितीकडे न्याय मागण्याचा अधिकार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक