शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आकर्षक क्रमांकातून मिळाले सोलापूर आरटीओला २२ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 5:28 PM

वाहनांची संख्या सव्वानऊ लाखांवर; एका महिन्यात २९८ जणांची क्रमांकाला पसंती

ठळक मुद्देदुचाकी व चारचाकी वाहनांना आकर्षक क्रमांक घेण्याची क्रेझ वाढलीकाहीवेळा एकाच क्रमांकासाठी दोनपेक्षा जास्त जणांची पसंती वाद टाळण्यासाठी शिल्लक क्रमांक स्क्रिनवर पाहण्याची सोय केली

सोलापूर : मार्च महिन्यात २९८ वाहनधारकांनी आकर्षक क्रमांकापोटी आरटीओ कार्यालयाला २२ लाख ४६ हजार शुल्क जमा केले आहे. अलीकडच्या काळात आकर्षक क्रमांकाला वाहनधारकांची पसंती वाढली आहे. त्यामुळे शासनाने उत्पन्नवाढीसाठी आकर्षक क्रमांकास शुल्क आकारले आहे.

केवळ मार्च महिन्यात २९८ वाहनधारकांनी आकर्षक क्रमांक घेतले.तीन हजारांपासून तीन लाखांपर्यंत आकर्षक क्रमांकांना शुल्क आकारले जाते. ३ लाख भरून आत्तापर्यंत कोणी वाहनांसाठी नंबर घेतलेला नाही. क्रमांक एकसाठी दुचाकी वाहन मालिकेतून चार चाकीसाठी क्रमांक घेताना इतके शुल्क आकारले जाते.

वाहनधारकांनी पुढीलप्रमाणे शुल्क आकारून क्रमांक घेतले आहेत. दीड लाख : १, सत्तर हजार : १, पन्नास हजार : २, पंचेचाळीस  हजार: ३, साडेबावीस हजार: १४, वीस हजार: १, पंधरा हजार: १८, साडेसात हजार: २८, पाच हजार: ७२, चार हजार: ७९, तीन हजार: ७0. अशा प्रकारे दरमहा आरटीओ कार्यालयास आकर्षक क्रमांकातून महसूल जमा होत आहे. दुचाकी व चार चाकीसाठी आकर्षक क्रमांकांना मागणी आहे. 

उपप्रादेशिक परिवहनकडे मार्चअखेर एकूण वाहनांची नोंद ९ लाख २६ हजार ८३९ इतकी झाली आहे. यात मोटरसायकल: ६ लाख ४ हजार १८, स्कूटर: ७९ हजार ३८८ आणि मोपेड : ७३ हजार ४0९ अशी दुचाकी  वाहनांची संख्या ७ लाख ५६ हजार ८१५ इतकी झाली आहे. त्या खालोखाल इतर वाहनांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कार : ४६ हजार ५८८,जीप : १५ हजार ५१९, टॅक्सी कॅब : २ हजार ५९६, आॅटो रिक्षा : १८ हजार १९५, स्टेज कॅरेज: ३२५, स्कूल बस: ७९६, अ‍ॅम्बुलन्स: २७४, ट्रक: ११ हजार ९९१, ट्रॅक्टर: २८ हजार ११६, फोर व्हिलर डिलिव्हरी व्हॅन: १८ हजार ६२६, थ्री व्हीलर : ९ हजार ३७, ट्रेलर : १५ हजार ८५७.

स्क्रीनवर पाहण्याची सोय : संजय डोळे - दुचाकी व चारचाकी वाहनांना आकर्षक क्रमांक घेण्याची क्रेझ वाढली आहे. काहीवेळा एकाच क्रमांकासाठी दोनपेक्षा जास्त जणांची पसंती येते. अशावेळी लिलाव काढण्याची वेळ येते. वाद टाळण्यासाठी शिल्लक क्रमांक स्क्रिनवर पाहण्याची सोय केली आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीसroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक