शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

पंढपुरातील वारकºयांनी केली तक्रार,  ‘दिली शिळी भाकरी’ आयोजकांनी सांगितले, ‘ही सोलापुरी कडक भाकरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 1:09 PM

पंढरपूर : एसटी महामंडळातर्फे पंढरपुरात बांधण्यात येणाºया यात्री निवास व बसस्थानकाच्या भूमिपूजन समारंभास राज्याच्या विविध भागातून वारकरी आले होते़ ...

ठळक मुद्देएसटी महामंडळातर्फे पंढरपुरात बांधण्यात येणाºया यात्री निवास व बसस्थानकाच्या भूमिपूजनपहाटेपासून प्रवास करून आलेले वारकरी जेवणाचे काय? असे म्हणताच त्यांना ज्वारीची कडक भाकरी आणि शेंगाची चटणी देण्यात आलीएसटी महामंडळाने विविध सवलतधारी प्रवाशांना आधारकार्ड सलग्न स्मार्टकार्ड देण्याचा निर्णय

पंढरपूर : एसटी महामंडळातर्फे पंढरपुरात बांधण्यात येणाºया यात्री निवास व बसस्थानकाच्या भूमिपूजन समारंभास राज्याच्या विविध भागातून वारकरी आले होते़  त्यामुळे पहाटेपासून प्रवास करून आलेले वारकरी जेवणाचे काय? असे म्हणताच त्यांना ज्वारीची कडक भाकरी आणि शेंगाची चटणी देण्यात आली़ त्यानंतर काही तरुण व वृद्ध वारकरी चिडून आम्हाला शिळी भाकरी दिल्याची तक्रार माध्यमासमोर केली. त्यावर स्पष्टीकरण करताना आयोजक म्हणाले, कडक भाकरी आणि शेंगाची चटणी हा सोलापुरी खास मेनू आहे़ शिवाय केळी आणि राजगिरा लाडूही असल्याचे सांगून तक्रारदारांना शांत केले.

या कार्यक्रमास माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष रणजितसिंह देओल, एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रतापसिंह सावंत, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यअधिकारी श्रीकांत भारती, उपमहाव्यवस्थापक राहुल तोरो, सुहास जाधव, विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड, विठ्ठल पाटील तसेच महाराज मंडळी उपस्थित होते.

दिवाकर रावते म्हणाले, वारकरी संप्रदाय हा प्रमुख भक्तीचा मार्ग आहे़ या मार्गाचे आराध्य दैवत पांडुरंग हा अवघ्या महाराष्ट्राचे भक्तीपीठ आहे. वारकरी हा महाराष्ट्राचे संस्कार व संस्कृती जपणारा आहे. या संस्काराच्या बळावर पंढरीत येणाºया भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येणाºया वारकरी व भाविक प्रवाशांना माफक दरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने यात्री निवासाचा उपयोग होणार असल्याचे  त्यांनी सांगितले.

एसटी महामंडळाने विविध सवलतधारी प्रवाशांना आधारकार्ड सलग्न स्मार्टकार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे़ या स्मार्टकार्डचे औपचारिक वाटप तसेच एसटीच्या विनावातानुकूलित शयनयान बसचे लोकार्पण दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले़यावेळी संत नामदेवांचे वंशज ह. भ. प. माधव महाराज नामदास, संत एकनाथांचे वंशज ह. भ. प. रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकारामांचे वंशज ह. भ. प. संजय महाराज देहूकर यांच्यासह अन्य  महाराज मंडळींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, महादेव महाराज शिवणीकर, बद्रिनाथ तनपुरे महाराज आदी महाराज मंडळी यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले भाविक उपस्थित होते.

संतांच्या वंशजांच्या हस्ते भूमिपूजनच्एसटी महामंडळाच्या वतीने बांधण्यात येणाºया यात्री निवास व बसस्थानकाचे भूमिपूजन संत नामदेवांचे वंशज ह. भ. प. माधव महाराज नामदास, संत एकनाथांचे वंशज ह. भ. प. रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकारामांचे वंशज ह. भ. प. संजय महाराज देहूकर यांच्या हस्ते करण्यात आला. संतांच्या वंशजांच्या हस्ते हा सोहळा पार पडल्याने उपस्थित वारकºयांनी टाळ्या वाजवून या उपक्रमाचे स्वागत केले़

यात्रीनिवास वारकरी सांप्रदायाला समर्पितसंताचे व वारकºयांचे माहेरघर असलेल्या पंढरीत एसटी महामंडळाच्या वतीने ३३ कोटी रुपये खर्चून यात्री निवास व सुसज्ज असे बसस्थानक बांधण्यात येणार आहे़ हे वारकरी संप्रदायाच्या प्रथा, परंपरेला समर्पित करीत असल्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी यावेळी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरDiwakar Raoteदिवाकर रावते