पांडुरंग कारखान्यातर्फे सेंद्रिय ऊस पीक परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:36+5:302021-08-21T04:26:36+5:30
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आ.प्रशांत परिचारक, दिनकर मोरे, रोहन परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्यासह संचालक मंडळ, युवा शेतकरी उपस्थित ...

पांडुरंग कारखान्यातर्फे सेंद्रिय ऊस पीक परिसंवाद
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आ.प्रशांत परिचारक, दिनकर मोरे, रोहन परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्यासह संचालक मंडळ, युवा शेतकरी उपस्थित होते. अलीकडे रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी सेंद्रिय ऊस पीक घेणे काळाची गरज आहे. यासाठी सेंद्रिय खताचे उत्पादन, औषध, पाणी व्यवस्थापन किंवा पिकामध्ये विविध प्रकारच्या लिक्विडचा योग्य वापर करावा. शेतात शेणखत किंवा कंपोस्ट खतांचा वापर करणे आवश्यक असल्याचे अनिल कुलकर्णी यांनी सांगितले.
जीवाणू खताचा वापर करा
अधिक ऊस उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केल्याने भविष्यात जमिनीची सुपीकता कमी होणार आहे. त्यासाठी पांडुरंग कारखान्याच्या माध्यमातून जैविक उत्पादने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुरवठा करीत आहोत. त्याचा लाभ घेऊन ऊस उत्पादनामध्ये वाढ करावी, असे आवाहन कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी केले.