शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनवाढीचा अध्यादेश सात दिवसांत निघणार, बालविकास विभाग सचिवांचे आश्वासन, सेवाज्येष्ठतेप्रमाणे मानधन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:59 IST

राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनाचा प्रश्न लवकरच निकाली काढणार असून, येत्या सात दिवसांत त्या संदर्भात शासनाचे परिपत्रक निघणार असल्याचे आश्वासन महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनितावेद सिंघल यांनी दिले आहे.

ठळक मुद्दे१७ जानेवारीला देशभरातील अंगणवाडी मानसेवी कर्मचाºयांनी केलेल्या संपादरम्यान कृती समितीच्या शिष्टमंडळापुढे त्यांनी हे आश्वासन दिलेअंगणवाडी कर्मचाºयांचे खासगीकरण करण्याला आणि कर्मचाºयांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्याच्या शासनाच्या भूमिकेचा अंगणवाडी कृती समितीने यावेळी विरोध केलाअंगणवाडी कर्मचाºयांना १ आॅक्टोबर २०१७ पासून वेतनातील फरक व एप्रिल महिन्यात पाच टक्के मानधन वाढ देण्याचे त्यांनी मान्य केले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२  : राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनाचा प्रश्न लवकरच निकाली काढणार असून, येत्या सात दिवसांत त्या संदर्भात शासनाचे परिपत्रक निघणार असल्याचे आश्वासन महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनितावेद सिंघल यांनी दिले आहे. १७ जानेवारीला देशभरातील अंगणवाडी मानसेवी कर्मचाºयांनी केलेल्या संपादरम्यान कृती समितीच्या शिष्टमंडळापुढे त्यांनी हे आश्वासन दिले.मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी मोर्चा कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व बृजपालसिंग बाघेला, शुभा शमिम यांनी केले होते. मोर्चादरम्यान महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनितावेद सिंघल यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले असता शिष्टमंडळाने अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या. त्यावरील चर्चेदरम्यान मानधनवाढीचा मुद्दा आठवडाभरात निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अंगणवाडी कर्मचाºयांना १ आॅक्टोबर २०१७ पासून वेतनातील फरक व एप्रिल महिन्यात पाच टक्के मानधन वाढ देण्याचे त्यांनी मान्य केले. पटसंख्या कमी असणाºया अंगणवाड्या बंद करून त्या अन्यत्र समायोजित करताना कुण्याही अंगणवाडी सेविकेची नोकरी जाणार नाही, असे अभय त्यांनी दिले. सेवासमाप्ती लाभाची रक्कम कर्मचाºयांना सेवासमाप्ती होताच दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिष्टमंडळात संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, कृती समितीचे शुभा शमिम, भगवान दवणे यांच्यासह अंगणवाडी सेविका सहभागी होत्या.--------------------------खासगीकरणाला विरोध- अंगणवाडी कर्मचाºयांचे खासगीकरण करण्याला आणि कर्मचाºयांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्याच्या शासनाच्या भूमिकेचा अंगणवाडी कृती समितीने यावेळी विरोध केला. शासनाची या संदर्भात तयारी असून तसे झाल्यास राज्यभरातून तीव्र विरोध नोंदविला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या संदर्भात सचिवांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र कृती समितीच्या भावना सरकारला कळविण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळा