सेतू चालकावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश

By Admin | Updated: July 4, 2014 01:29 IST2014-07-04T01:29:17+5:302014-07-04T01:29:17+5:30

दोन दलालांना अटक : जिल्हाधिकाऱ्यांची अचानक तपासणी

Order to file an offense driver's order | सेतू चालकावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश

सेतू चालकावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश


सोलापूर : सेतूमध्ये दलालांना प्रवेश देऊ नये तसेच सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र असणे बंधनकारक करा, असे सक्त आदेश देऊन देखील सेतू चालकाने याकडे दुर्लक्ष केले. यामुळेच सेतूमध्ये दलालांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले़ जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम हे सायंकाळी सहा वाजता सेतू कार्यालयात अचानक गेल्यावरही येथे दोन दलाल आढळले. त्यांच्यासह सेतू चालकांवरही गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे़
सेतू कार्यालयातील गर्दी आणि येथे दलालशाही यामुळे सोमवारी एका युवकास दलालाने जोरदार मारहाण केली होती़ त्यानंतर सेतूमधील कारभार सुधारेल, असे वाटले होते. मात्र पुन्हा दलालांचे काम जोमाने सुरू झाले़ महसूल खात्यातील काही कर्मचाऱ्यांचीदेखील त्यांना साथ आहे़ जिल्हाधिकारी सहा वाजता सेतू कार्यालयात गेल्यावर येथे अनेक गैरबाबी दिसल्या़ एक अपंग महिला आणि एका युवकास अटक करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले़ सय्यद नावाच्या दलालाकडे तब्बल १७ पावत्या आढळल्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले़ सेतू चालकाची यात चूक असल्यामुळे ठेकेदार पेस सिस्टम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांना दिले आहेत़
सेतूमध्ये चालकाने सुरक्षिततेसाठी कर्मचारी नेमणे, मोफत फॉर्म भरण्यासाठी सुविधा निर्माण करणे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्याचे करारपत्रात आहे; मात्र या अटी त्यांनी पाळल्या नाहीत, हे देखील टेंडर रद्द करण्याचे कारण असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले़
-----------------------------
लवकरच नवीन सेतू चालक
सध्याचा सेतू चालविण्याचा ठेका पेस सिस्टम यांना देण्यात आला असून विविध कारणास्तव त्यांचा ठेका रद्द करण्यात आला आहे़ मात्र त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे़ सेतूचा नवा ठेकेदार नेमण्यासाठी प्रसिद्धीकरण केले असून आयबीएम टेक्नॉलॉजी, जेएमके इन्फोटेक, गुजरात इन्फोटेक आणि सी शस्त्र या चार जणांच्या निविदा आल्या आहेत़ तांत्रिक तपासणी करून सेतू एजन्सी निश्चित केली जाईल; मात्र वर्क आॅर्डर न्यायालयाच्या निर्णयानंतर दिली जाणार आहे़
---------------------------
सेतूमध्ये कोणालाही जादा पैसे देऊ नयेत़ महसूल कर्मचाऱ्यांची जरी लिंक असेल तर त्यांच्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या ९५५२३३४५९९ या क्रमांकावर तक्रार करावी़ माझ्याकडेही तक्रार केली तरीही मी कारवाई करेऩ सेतू चालक दलालांना आत कसे येऊ देतो ?
- डॉ. प्रवीण गेडाम
जिल्हाधिकारी

Web Title: Order to file an offense driver's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.