शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

सोलापूर जि.प.च्या ताब्यात आजही नाहीत पाझर तलावांच्या शेकडो जमिनी, ७/१२ वर सीईओंचे नाव लावण्याचे अभियंत्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:21 AM

शासकीय दरबारी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या नावावर १२४१ पाझर तलावाची नोंद असली तरी यातील शेकडो तलावांच्या जमिनी कायदेशीरपणे जिल्हा परिषदेच्या ताब्यात नाहीत. अनेक जमिनींच्या ७/१२ उताºयावर जिल्हा परिषदेचे नाव नाही. बहुतांश ठिकाणी अतिक्रमणांचा विळखा आहे.

ठळक मुद्देशेकडो एकर जमिनीच्या ७/१२ उताºयावर जिल्हा परिषदेचे नाव लावण्याची प्रक्रिया सुरूजि.प.च्या लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ७/१२ उताºयाच्या नोंदीसंदर्भात आदेशजिल्ह्यातील १४५ तलावांच्या जमिनींच्या अधिग्रहणाचा विषय अद्याप बाकी

राकेश कदम सोलापूर दि १० : शासकीय दरबारी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या नावावर १२४१ पाझर तलावाची नोंद असली तरी यातील शेकडो तलावांच्या जमिनी कायदेशीरपणे जिल्हा परिषदेच्या ताब्यात नाहीत. अनेक जमिनींच्या ७/१२ उताºयावर जिल्हा परिषदेचे नाव नाही. बहुतांश ठिकाणी अतिक्रमणांचा विळखा आहे. ही ‘भानगड’ लक्षात आल्यानंतर जि. प. प्रशासनाने महसूल आणि पाटबंधारे यंत्रणेमार्फत या शेकडो एकर जमिनीच्या ७/१२ उताºयावर जिल्हा परिषदेचे नाव लावण्याची प्रक्रिया सुरू  केली आहे. जिल्हा परिषदेने गेल्या ५४ वर्षांत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून १२४१ पाझर तलावांची निर्मिती केली. त्यासाठी शेतकºयांकडून १० एकरापासून ४५ एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. लाखो रुपये खर्च झाले. भूसंपादन केल्यानंतर महसूल आणि लघु पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन अधिकाºयांनी या जमिनीच्या ७/१२ उताºयावर जिल्हा परिषदेचे नाव लावणे अपेक्षित होते. काही जमिनींवर केवळ पाझर तलाव अशाच नोंदी आहेत. ही बाब मागील काळातही अनेक पाटबंधारे अधिकाºयांच्या लक्षात आली. मात्र त्यांनीही कार्यवाही केली नाही. या जमिनी अशाच राहिल्याने त्यांची विक्री झाल्याची आणि कागदपत्रे गायब केल्याची शक्यता नाकारता येत नाहीत. लघु पाटबंधारे विभागाचे सध्याचे कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर यांनी चार वर्षांपूर्वी हे काम सुरू केले होते. तेव्हा या कामात महसूल यंत्रणा सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी पाटबंधारे विभागातील अधिकाºयांनी केल्या होत्या. देवकर यांच्या बदलीनंतर हे काम रेंगाळले. आता मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे यांनी हे काम पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांनी उपअभियंता आणि शाखा अभियंत्यांना माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.-------------------------अतिक्रमणाचा विळखा !- जि.प.चे एक उपभियंता म्हणाले की, अनेक तलावांच्या जमिनींना अतिक्रमणाचा विळखा आहे. काही ठिकाणी बेकायदेशीरपणे पेरणी होते तर काही ठिकाणी बागाही फुलविण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर विहिरींची संख्या खूप आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे बºयाच मालमत्ता जि.प.च्या ताब्यात आलेल्या नाहीत. काही जागांची परस्पर विक्री झालेली असू शकते. या कामाला महसूल विभागाचे सहकार्य अपेक्षित आहे. महसूल कर्मचाºयांनी सहकार्य न केल्यास हे काम पुन्हा रेंगाळणार आहे. १४५ ठिकाणी अधिग्रहण बाकी- जिल्ह्यातील १४५ तलावांच्या जमिनींच्या अधिग्रहणाचा विषय अद्याप बाकी असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे यांनी सांगितले. या कामासंदर्भातही शेतकºयांशी वाटाघाटी करून निर्णय घेण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. तलावांच्या जमिनींवर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी अद्याप आमच्याकडे आलेल्या नाहीत. शिवाय गाळपेरासंदर्भात प्रस्ताव आल्यानंतर स्थायी समितीच्या मंजुरीनेच आदेश दिले जातील, असेही त्यांनी सांगितले. --------------------जि.प.च्या लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ७/१२ उताºयाच्या नोंदीसंदर्भात आदेश दिले आहेत. उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता या सर्वांनीच महसूल यंत्रणेच्या मदतीने हे काम करायचे आहे. तहसीलदारांनाही यासंदर्भात सहकार्याचे पत्र देण्यास सांगितले आहे. किती तलावांच्या जमिनींचे अधिग्रहण झाले आहे. किती तलावांच्या जमिनींचे अधिग्रहण करणे बाकी आहे. यासंदर्भातील माहिती संकलित करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. - पोपट बनसोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सोलापूर.--------------------------

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद