शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर अत्याचार; काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंवर गुन्‍हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 21:53 IST

व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करून दिलीप माने व धनंजय भोसले यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले.

सोलापूर : तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी माजी आमदार तथा विधान परिषदेचे काँग्रेसचे विद्यमान उमेदवार दिलीप मानेंसह पाच जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करून दिलीप माने व धनंजय भोसले यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. त्यामुळे पीडित तरुणीने घाबरून दिलीप माने व धनंजय भोसले यांच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. अशी तक्रार पीडित तरुणीने न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप ब्रह्मदेव माने (वय 52, रा. महिला  हॉस्पिटलजवळ, सोलापूर),  निखिल नेताजी भोसले (30), त्याची पत्नी तृप्ती निखिल भोसले (30), आई वेदमती नेताजी भोसले (48, सर्व रा. महिला हॉस्पिटलजवळ, सोलापूर), धनंजय भोसले (45,  रा. डी-मार्टजवळ, जुळे सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण - यातील पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित तरुणीशी निखिल भोसले याने विवाहविषयक  वेबसाईटवरून मे 2016 मध्ये ओळख केली व मैत्री वाढविली. त्यानंतर निखिल भोसले याने त्या तरुणीशी तुळजापूर येथे लग्‍न केले. त्यानंतर निखिलने त्या तरुणीशी तुळजापूर व सोलापूर-पुणे महामार्गावरील एका ठिकाणी शरीरसंबंध ठेवले व त्या तरुणीचे नग्‍न फोटो काढले. निखिलची पहिली पत्नी तृप्ती व आई वेदमती यांनी निखिलने काढलेले फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करून दिलीप माने व धनंजय भोसले यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. त्यामुळे पीडित तरुणीने घाबरून दिलीप माने व धनंजय भोसले यांच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर तृप्ती भोसले हिने त्या तरुणीचे  फोटो सोशल मीडियावर पाठवण्याची धमकी दिली व 2 कोटी रुपयांची मागणी केली.  निखिल व तृप्ती या दोघांनी पीडितेचे 6 तोळ्याचे मंगळसूत्र घेतले. तृप्तीने पीडित तरुणीचा व निखिलचा विवस्त्र फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले. त्यानंतर सर्वांनी मिळून पीडित तरुणीवर अ‍ॅसिड टाकून तिला ठार मारण्याची धमकी दिली म्हणून पीडितेने न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. 

टॅग्स :congressकाँग्रेसCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे