पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थच्या उमेदवारीला सोशल मीडियावर विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:22 IST2020-12-29T04:22:20+5:302020-12-29T04:22:20+5:30

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार ...

Opposition to Parth's candidature from Pandharpur-Mangalwedha constituency on social media | पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थच्या उमेदवारीला सोशल मीडियावर विरोध

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थच्या उमेदवारीला सोशल मीडियावर विरोध

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत. या बातम्यांना कोणताही आधार नाही. भारतनाना भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून, स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचारविनिमय करूनच या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरविण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार निवड समितीच्या माध्यमातून घेण्यात येईल. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असून, महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

----

स्थानिक उमेदवारच; मात्र कोण याबाबत संभ्रम कायम

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले असले तरी भगीरथ भालकेंचे नाव जाहीर केले नाही, यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे. तसेच उमेदवारी मिळवण्यासाठी कोण कशी फिल्डिंग लावणार, अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

--------

Web Title: Opposition to Parth's candidature from Pandharpur-Mangalwedha constituency on social media