शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi 3.0 : गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र...; भाजप आपल्याकडेच ठेवणार 'CCS' मधील ही महत्वाची मंत्रालयं!
2
मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, महाराष्ट्रातील 'या' ६ खासदारांच्या नावांची चर्चा
3
Jayant Patil : "समुद्र नाही याची पुणेकरांना खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला"
4
मस्तच! रोज एक चमचा तूप खाण्याचे असंख्य फायदे; रोगप्रतिकारक शक्ती होईल मजबूत अन्...
5
सावधान! Android युजर्ससाठी धोक्याची घंटा; तुमचा फोन होऊ शकतो हॅक, सरकारचा इशारा
6
भीषण परिस्थिती! कोरडा दुष्काळ, वाटीभर पाण्यासाठी रांगा; अंगावर काटा आणणारे दृश्य
7
नाशिकचे स्वच्छतादूत चंद्रकांत पाटील यांना मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण
8
प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी, सायंकाळी मोदी सरकारमध्ये घेणार शपथ
9
Sara Tendulkar Net Worth : सचिनची 'लेक' कोट्यवधीची मालकीण; जाणून घ्या 'सारा' कमाईचा स्त्रोत
10
मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या NDA सरकारमध्ये काय असेल अमित शाह यांची भूमिका?
11
VIDEO: १६ फूटांच्या अजगराने महिलेला जिवंत गिळले; तीन दिवसांनी पोटातून...
12
Mamata Banerjee : नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार का?; ममता बॅनर्जींनी स्पष्ट केली भूमिका
13
Modi 3.0 : 'टीम मोदी'मध्ये कोण-कोण? मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी कुणा-कुणाला आला फोन? येथे पाहा 'लेटेस्ट लिस्ट'!
14
IND vs PAK : पाकिस्तानने चूक दुरुस्त केली; भारताविरूद्धच्या सामन्यासाठी संघात मोठा बदल केला
15
Adhir Ranjan Chowdhury : "जास्त दिवस टिकणार नाही मोदी सरकार, राहुल गांधींना..."; अधीर रंजन यांची भविष्यवाणी
16
समुद्र पाहण्यासाठी गेली अन् महागडा iphone पडला; ७ तास चालले बचावकार्य, Video
17
नरेद्र मोदींनी शपथविधीसाठी रविवारचा दिवसच का निवडला? प्रभू श्रीरामांसोबत आहे खास कनेक्शन!
18
इस्रायली सैन्याचे मोठे यश! तब्बल २४५ दिवसांनी चार ओलिसांची हमासच्या तावडीतून सुटका
19
“जेव्हा लक्ष्याच्या निधनाबद्दल कळलं तेव्हा…”; महेश कोठारेंनी सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग
20
IND vs PAK : दोन दिवसांपूर्वी जे झालं ते आम्ही आता विसरलोय; पाकिस्तानच्या कोचचं विधान

सोलापूर जिल्ह्यातील हिरजचे ‘रेशीम पार्क’ उभारणीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:49 PM

निधीला मिळाली मंजुरी: साडेसहा कोटी रुपये खर्चून कोष बाजारपेठची उभारणी

ठळक मुद्देसोलापूरच्या शेतकºयांना याचा मोठा फायदा होणार तुतीच्या लागवडीचे क्षेत्रही जिल्ह्यात वाढत आहेरेशीम पार्क कोष बाजारपेठेचा किमान १० हजार शेतकºयांना फायदा

अरूण बारसकर सोलापूर : हिरज येथे रेशीम पार्क उभारणीसाठी ६ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले. जालन्यानंतर सोलापुरात रेशीम पार्क अंतर्गत कोष बाजारपेठ उभारली जाणार आहे.

मागील तीन-चार वर्षांत पश्चिम महाराष्टÑातील सांगली, पुणे व सोलापूर जिल्ह्यातही तुतीचे क्षेत्र वाढत आहे. याशिवाय शेजारच्या कर्नाटक राज्यातही शेतकरी रेशीम उत्पादन घेत असल्याने कोषची बाजारपेठ तयार होण्यासाठी हिरज येथे रेशीम पार्क उभारणीसाठी १० एकर जमीन जिल्हाधिकाºयांनी जिल्हा रेशीम विकास अधिकाºयांना हस्तांतरित केली आहे.

या जमिनीवर रेशीम पार्कची उभारणी करण्यात येणार असून, यासाठी नागपूर रेशीम संचालनालयामार्फत शासनाकडे प्रस्ताव गेला होता. रेशीम पार्कसाठी इमारत व अन्य सुविधांसाठी ६ कोटी ५४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक शासनाकडे पाठविले होते. त्याला नुकतीच राज्याच्या कृषी खात्याने मंजुरी दिली असल्याने आता पुढील कामे लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

मराठवाड्यातील जालना येथे मागील वर्षी रेशीम पार्क उभारणीसाठी ६ कोटी १९ लाख रुपये मंजूर झाले असून, त्यातून कामे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील हिरज येथे उभारले जाणारे रेशीम पार्क हे राज्यातील व लगतच्या कर्नाटकातील शेतकºयांसाठी दुसरी कोष बाजारपेठ होणार असल्याचे सांगण्यात आले.

१० हजार शेतकºयांना फायदा- हिरज येथील रेशीम पार्क कोष बाजारपेठेचा किमान १० हजार शेतकºयांना फायदा होईल असे सांगण्यात आले. कमी पाण्यावर चांगला पैसा मिळवून देणारे व वर्षभर उत्पादन घेता येणारे पीक म्हणून तुतीचा उल्लेख मराठवाड्यात केला जातो, असे उपसंचालक(रेशीम) अर्जुन गोरे म्हणाले. शेजारच्या उस्मानाबाद, पुणे व कर्नाटकातील काही जिल्हे तसेच सोलापूर जिल्ह्यातील १० हजार शेतकरी हिरजच्या रेशीम पार्कशी जोडले जातील, असेही गोरे म्हणाले. 

यातून ही होतील कामे- या निधीतून शिवाय आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजनमधून निधीची मागणी करुन आवश्यक ती संपूर्ण कामे केली जाणार असल्याचे नागपूर येथील उपसंचालक(रेशीम) अर्जुन गोरे यांनी सांगितले. जमीन सपाटीकरण, संरक्षण भिंत, वीज, पाणी, शेतकºयांसाठी प्रशिक्षण हॉल, कार्यालयासाठी इमारत व अन्य सुविधांसाठी हा निधी वापरला जाणार आहे.

हिरज येथील कोष खरेदी-विक्री बाजारपेठ उभारणीचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सोलापूरच्या शेतकºयांना याचा मोठा फायदा होणार असल्याने तुतीच्या लागवडीचे क्षेत्रही जिल्ह्यात वाढत आहे.- अर्जुन गोरे, उपसंचालक(रेशीम) नागपूर 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय