शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रोजगार हमी योजनेत फक्त अडीच हजार मजुरांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:15 IST

सोलापूर जिल्हा : मजुरी कमी असल्याने कामांकडे मजुरांची पाठ

 बाळकृष्ण दोड्डीसोलापूर : मागील काही वर्षांत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेला ग्रामीण भागातील मजुरांकडून प्रतिसाद मिळेना. दिवसेंदिवस कामांची संख्या आणि मजुरांची संख्या यात घट होत आहे. सध्या प्रतिदिन २३८ रुपये मजुरी आहे.

प्रतिवर्षी दोन ते पाच रुपयांची मजुरीवाढ मिळते. खासगी ठेकेदारांकडून प्रतिदिन पाचशे ते हजार रुपये मजुरी मिळत असल्याने ग्रामीण भागातील मजूर शहराकडे वळत आहेत. मजुरी चांगली मिळत असल्याने खासगी बांधकामांकडे मजुरांचा ओढा अधिक आहे.

सोलापूर जिल्ह्यात सध्या ४१९ कामे सुरू आहेत. यात २६५९ मजूर कार्यरत आहेत. एकेकाळी लाखो मजूर या योजनेंतर्गत काम करायचे. आता ही संख्या बोटांवर मोजण्याइतकी आहे. डिसेंबर २०१९ दरम्यान सोलापूर जिल्ह्यात ५५४ कामे सुरू होती. 

त्यावेळी ३१०९ मजूर कार्यरत होते. एप्रिल २०१९ ला फक्त ३६८ कामे सुरू होती. त्यावेळी २२७३ मजूर कार्यरत होते. ऑक्टोबर २०१९ ला १४९ कामे          सुरू होती. त्या वेळेस ७३३ मजूर कार्यरत होते.

रोजगाराची साधने वाढली..केंद्र सरकारकडून ही योजना राबविली जाते. या योजनेचा देशभरात बोलबाला होता. ग्रामीण भागातील बेरोजगारांना वर्षातील शंभर दिवस हमखास काम, या योजनेंतर्गत मिळते. पूर्वी रोजगाराची साधने कमी होती, त्यामुळे या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळायचा. आता रोजगाराची साधने वाढली आहेत. लोक शहराकडे मजुरीसाठी येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळतोय.

आता माझे वय पंचेचाळीस आहे. सात-आठ वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेवर कामाला जायचो. त्यावेळी ती मजुरी परवडायची. आता महागाई वाढली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत फक्त २३८ रुपये मिळतात. या तुलनेत शहरातील खासगी बांधकाम ठेकेदाराकडे आठशे रुपये मजुरी मिळते. त्यामुळे मी आणि माझे अनेक सहकारी रोजगार हमी योजनांच्या कामांवर जात नाही.- रामदास मोरे, मोहोळ तालुका

टॅग्स :SolapurसोलापूरGovernmentसरकारagricultureशेतीFarmerशेतकरी