्रंपंढरपूर पंचायत समितीत केवळ तीनच महिलांना मिळाली सभापतीची संधी
By Admin | Updated: January 24, 2017 20:09 IST2017-01-24T20:09:48+5:302017-01-24T20:09:48+5:30
्रंपंढरपूर पंचायत समितीत केवळ तीनच महिलांना मिळाली सभापतीची संधी

्रंपंढरपूर पंचायत समितीत केवळ तीनच महिलांना मिळाली सभापतीची संधी
्रंपंढरपूर पंचायत समितीत केवळ तीनच महिलांना मिळाली सभापतीची संधी
पंढरपूर - पंढरपूर पंचायत समितीच्या स्थापनेपासून ५५ वर्षांच्या कालावधीत केवळ तीन महिलांना सभापतीपदाची संधी मिळाली आहे, तर आतापर्यंत केवळ दोन महिलांना उपसभापतीपदाची धुरा सांभाळता आली़
१९६२ साली स्थापन झालेल्या पंढरपूर पंचायत समितीचे पहिले सभापती होण्याचा मान स्वातंत्र्यसेनानी बाबुराव विठोजी बागल यांना मिळाला होता़ त्यानंतर मात्र तब्बल ३७ वर्षांनी म्हणजेच १४ मार्च १९९९ साली पहिल्या महिला सभापतीचा मान सुरेखा दिलीप गुरव यांना मिळाला़ सुरेखा गुरव यांनी १३ मार्च २००२ पर्यंत सभापतीपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली़ त्यांच्या कार्यकाळातच मंगल सुखदेव शिंदे याही पहिल्या उपसभापती म्हणून कार्यभार सांभाळला़ एकाचवेळी तेही प्रथमच महिलांना सभापती व उपसभापतीची संधी मिळाली़ हा खरोखरच पंढरपूर पंचायत समितीच्या इतिहासातील अभिमानाची बाब होती़
दुसऱ्या महिला सभापती होण्याचा मान १४ मार्च २०१२ साली पुष्पा माणिक जाधव यांना मिळाला़ त्यांनी १४ नोव्हेंबर २०१४ पर्यंत सभापतीपदाची जबाबदारी चोखपणे सांभाळली़ त्यानंतर आता वर्षाराणी माणिक बनसोडे या सभापतीपदाची धुरा सांभाळत आहेत़ या दोघींच्या कार्यकाळात विष्णू बागल हे उपसभापती म्हणून कार्यभार सांभाळत आहेत़
वामनराव माने हे सभापती असताना १० फेब्रुवारी २००५ साली प्रेमलता पुरुषोत्तम पवार यांना उपसभापतीपदाची संधी मिळाली़ अशा प्रकारे पंचायत समितीच्या ५५ वर्षांच्या कालावधीत केवळ तीनच महिलांना सभापतीपदाची तर दोन महिलांना उपसभापतीपदाची संधी मिळाली आहे़
--------------------------
पाच वर्षांत दोन महिलांना संधी
पंढरपूर पंचायत समितीच्या ५५ वर्षांच्या वाटचालीत केवळ तीन महिलांना सभापतीपदाची संधी मिळाली आहे़ त्यातील एकाही महिला सभापतीला पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळाला नाही़ सुरेखा गुरव यांना तीन वर्षांचा कालावधी मिळाला तर २०१२ ते २०१७ या पाच वर्षांच्या कालावधीत पुष्पा जाधव व वर्षाराणी बनसोडे यांना अडीच-अडीच वर्षे सभापती म्हणून संधी मिळाली़