शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
2
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
3
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
4
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
5
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
6
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
7
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
9
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
10
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
11
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
12
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
13
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
14
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
15
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
16
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
17
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
18
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
19
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
20
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले

बार्शीत विष्णूचे भगवंत रूपातील एकमेव मंदिर, हेमाडपंथी शैलीचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 09:37 IST

Vishnu Bhagwant Mandir: मंदिराच्या गाभाऱ्यासमोर गरुड खांब आहे. नक्षीदार कलाकुसर असलेला मंदिराचा सभामंडप सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा असावा, असा अभ्यासकांचा कयास आहे. मंदिरात दत्त महाराज, विठ्ठल-रुक्मिणी, जोगा परमानंद, गणपती आदी देवतांच्या मूर्ती आहेत.

बार्शी (सोलापूर) : भगवान विष्णूचे नऊ अवतार अन्‌ त्यांचा महिमा सर्वांना ठाऊक आहे, पण भगवंताच्या रूपातील श्री विष्णू बार्शीत विराजमान आहेत. हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आलेले भगवंत स्वरूपातील विष्णूचे हे देशातील एकमेव मंदिर असून, सोमवारी वैशाख शुद्ध द्वादशीला ‘श्रीं’चा प्रकट दिन साजरा होत आहे. यंदा कोरोनामुळे भक्तांच्या उपस्थितीशिवाय केवळ विधी होणार आहेत, अशी माहिती मंदिर समितीतर्फे देण्यात आली.राजा अंबरीषाच्या रक्षणासाठी साक्षात् श्रीविष्णूने लक्ष्मीसह ‘भगवंत’ या नावाने येथे अवतार घेतल्याचा पुराणात उल्लेख आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एकादशी करून श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊन बार्शी येथे द्वादशीदिवशी श्रीभगवंत दर्शन-पूजनानंतर उपवास सोडायचा, असा वारकऱ्यांचा वर्षानुवर्षांचा प्रघात पडलेला आहे.मंदिराच्या गाभाऱ्यासमोर गरुड खांब आहे. नक्षीदार कलाकुसर असलेला मंदिराचा सभामंडप सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा असावा, असा अभ्यासकांचा कयास आहे. मंदिरात दत्त महाराज, विठ्ठल-रुक्मिणी, जोगा परमानंद, गणपती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. या मंदिरासाठी नानासाहेब पेशव्यांनी १७६०, इस्ट इंडिया कंपनीने १८२३ मध्ये सनदा देऊ केल्या. बार्शीचे भगवंत मंदिर पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराशी साधर्म्य साधणारे आहे. सोळाखांबी मंदिर आणि गरुड खांब मंदिराचे आध्यात्मिक आणि प्राचीन महत्त्व अधोरेखित करतात. 

उत्सव अन्‌ सोहळे आषाढी, कार्तिकी एकादशीला गरुडावर आरूढ श्री भगवंताची मिरवणूक निघून नगर प्रदक्षिणा होते. पौर्णिमेला छबिना निघतो. रथातून ही उत्सवमूर्तीची मिरवणूक निघते. पालखी निघते.  मंदिरात नित्य काकडाआरती, नित्य पूजा-महापूजा, सायंकाळी धुपारती व रात्री शेजारती आदी कार्यक्रम होतात. वैशाख शुद्ध षष्ठी ते वैशाख शुद्ध द्वादशी म्हणजे श्री भगवंत प्रकट दिनापर्यंत श्री भगवंत प्रकट दिन सप्ताह, भागवत सप्ताह, तुकाराम बीज, गोकुळ अष्टमी, दासनवमी व वर्षभर प्रवचने, कीर्तनाचा कार्यक्रम व अन्य उत्सवही होतात.

टॅग्स :Solapurसोलापूरhistoryइतिहास