‘शिवाजी’मध्ये माजी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:15 IST2021-06-27T04:15:42+5:302021-06-27T04:15:42+5:30

सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये २०२०-२१ मधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ऑनलाइन पद्धतीने पार पडला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विश्वस्त महादेव गायकवाड ...

Online meeting of alumni in 'Shivaji' | ‘शिवाजी’मध्ये माजी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन मेळावा

‘शिवाजी’मध्ये माजी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन मेळावा

सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये २०२०-२१ मधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ऑनलाइन पद्धतीने पार पडला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विश्वस्त महादेव गायकवाड होते. प्रारंभी सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनानंतर माजी विद्यार्थ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार केला.

यावेळी माजी विद्यार्थी रवी यादव, समीक्षा नवले, सुप्रिया साळे, प्रणव जाधव, आकाश गोंजारी, चंद्रशेखर गायकवाड, आरती जमदाडे, शिवानी जाधव, अभिषेक गडहिरे, राजू पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संस्थाध्यक्ष बाबुराव गायकवाड, सचिव अंकुश गायकवाड, उपप्राचार्य विक्रांत गायकवाड, माधुरी गायकवाड, प्राचार्य डॉ. रणजित देशमुख, प्रा. गणेश मिसाळ, प्रा. आनंद गायकवाड उपस्थित होते. यासाठी विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा. एस. एम. सावंत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्रेया कुलकर्णी व प्रा. पूजा पाटील यांनी केले. प्रा. पी. सी. चव्हाण यांनी आभार मानले.

Web Title: Online meeting of alumni in 'Shivaji'