क्यूआर कोडद्वारे केली ३३ हजारांची ऑनलाइन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:40 IST2021-03-04T04:40:30+5:302021-03-04T04:40:30+5:30
संशयित आरोपी दयानंद मिश्रा याने २८ फेब्रुवारी दु. ४:३० च्या सुमारास परीट गल्ली-सांगोला येथील मोहसीन मुसाहजरत इनामदार याची मावस ...

क्यूआर कोडद्वारे केली ३३ हजारांची ऑनलाइन फसवणूक
संशयित
आरोपी दयानंद मिश्रा याने २८ फेब्रुवारी दु. ४:३० च्या सुमारास परीट गल्ली-सांगोला येथील मोहसीन मुसाहजरत इनामदार याची मावस बहीण मन्सुरा काझी यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहण्यास येतो, असा बहाणा करीत मोहसीन इनामदार यांच्या ७०४५०९३१८५ या गुगल पे अकाउंटवर दयानंद मिश्रा याने ५ रुपयांचा क्यूआर कोड तयार करून पाठवला. लगेचच त्याने ३३ हजार रुपयांचा क्यूआर पाठवला असता तो मोहसीन इनामदार यांनी स्कॅन केला. त्यांच्या अकाऊंटवरून दयानंद मिश्रा यांनी क्यूआर स्कॅन होताच त्याच्या अकाउंटवरून त्याचे ६००१६८४८६४ यावर (गुगल पे वर) ३३ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर झाल्याचा एसएमएस आला. म्हणून मोहसीन इनामदार यांनी तात्काळ दयानंद मिश्रा यांना फोन करून अकाउंटवरून ३३ हजार रुपये ट्रान्सफर झाल्याबाबत विचारणा केली असता त्याने मला काही माहीत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन कट केला. मोहसीन इनामदार यांनी त्याच्या फोनवर फोन करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने तो उचलला नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. याबाबत मोहसीन मुसाहजरत इनामदार, सांगोला यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दयानंद मिश्रा याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.