शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

आॅनलाईन चोरांचा सायबर सेलकडून छडा, सोलापूर शहर पोलीसांच्या सायबर सेलने मिळवून दिले २.७३ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 1:32 PM

आपल्या मोबालईवर अनोळखी नंबरवरुन फोन येतो. आपले एटीएम कार्डची माहिती विचारली जाते. अन्यथा आपले कार्ड बंद होईल असा इशारा दिला जातो. भीतीने आपण माहिती सांगतो अािण क्षणात आपल्या खात्यावरील पैसे वजा झाल्याचा संदेश येतो तेव्हा आपण अचानक घडलेल्या या प्रकाराने गोंधळून जातो. अशा वेळी पोलिसांच्या सायवर शाखेला त्वरीत कळवल्यास पैसे परत मिळवता येणे शक्य झाले

ठळक मुद्देई-फसवणूक झाल्यास चोवीस तासांत पोलिसांच्या सायबर सेलकडे बँक स्टेटमेंटसह संपर्क साधामागील अकरा महिन्यांत सोलापूर शहर सायबर सेलकडे १०० तक्रारी अर्ज आले ४२ जणांची ११ लाख ३६ हजार ९२ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार होती

अमित सोमवंशीआॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११  : आपल्या मोबालईवर अनोळखी नंबरवरुन फोन येतो. आपले एटीएम कार्डची माहिती विचारली जाते. अन्यथा आपले कार्ड बंद होईल असा इशारा दिला जातो. भीतीने आपण माहिती सांगतो अािण क्षणात आपल्या खात्यावरील पैसे वजा झाल्याचा संदेश येतो तेव्हा आपण अचानक घडलेल्या या प्रकाराने गोंधळून जातो. अशा वेळी पोलिसांच्या सायवर शाखेला त्वरीत कळवल्यास पैसे परत मिळवता येणे शक्य झाले असून पोलिसांनी आतापर्यंत २३ तक्रारींचा निपटारा करुन २.७३ लाख रुपये परत मिळवून दिले आहेत. इंटरनेट किंवा मोबाईलवरून एटीएम कार्ड तसेच अन्य प्रकारची बँकेच्या संबंधातील आर्थिक ई-फसवणूक झाल्यास चोवीस तासांत पोलिसांच्या सायबर सेलकडे बँक स्टेटमेंटसह संपर्क साधा, तुमचे पैसे परत मिळतील. मागील अकरा महिन्यांत सोलापूर शहर सायबर सेलकडे १०० तक्रारी अर्ज आले आहेत़ त्यात ४२ जणांची ११ लाख ३६ हजार ९२ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार होती. यापैकी  २३ जणांनी बँक स्टेटमेंटसह चोवीस तासांत सायबर सेलकडे धाव घेतल्याने त्यांना पैसे मिळवून देणे सायबर सेलला सोपे झाले.  ‘आॅनलाईन’मुळे घरबसल्या व्यवहार करणे सोपे झाले; पण आॅनलाईन बँकिंग आणि खात्याची माहिती गुप्त ठेवण्याबाबत आजही अनेक ग्राहकांमध्ये जागरुकता नसल्याचे दिसून येते. सर्वच क्षेत्रांमध्ये आधुनिकतेचा वापर वाढल्यामुळे या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. आपल्याला कंपनीकडून एक कोटीचे बक्षीस लागले आहे, त्यासाठी तुम्हाला काही टक्के म्हणजे दोन किंवा चार लाख रुपये भरावे लागतील, असे संदेश येतात. पैशाच्या हव्यासापोटी अनेकांनी  लाखापर्यंत पैसे भरल्यानंतर फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. काही वेळा आपण बँकेचे मॅनेजर बोलतोय, तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपली आहे, जुने कार्ड रद्द करुन तुम्हाला नवीन कार्ड दिले जाणार आहे. तुमचा सांकेतिक क्रमांक द्या, असे सांगून त्याद्वारे अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढले जातात. चोरट्यांकडून आधुनिक तंत्रांचा वापर करुन बँक खातेदारांना लक्ष्य करीत त्यांच्या खात्यातील रक्कम लंपास करण्याचे प्रकार वाढत आहेत. ------------------------अनेकांना लाखोंचा गंडाआॅनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. सोलापूर शहरात १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान सोलापूर शहर सायबरकडे ४३ जणांनी तक्रार दाखल केली असून, त्यांची ११ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे अर्ज आहेत. याचा तपास सुरू असला तरी बहुतांशी गुन्ह्यांत ग्राहकांकडून भलत्याच व्यक्तीला ओटीपी, पिन नंबर दिल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. बँकेतून बोलतोय, एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, बँकेकडून पडताळणी सुरू आहे, पिन नंबर, ओटीपी नंबरची मागणी केली जाते. यास बहुतांशी ग्राहक फसतात. सर्व बँक डिटेल देतात. दोन दिवसांत या ग्राहकांच्या बँक खात्यातून आॅनलाईन रक्कम काढली जाते. शेअर करणे अशा २७ तक्रारी सायबर सेलकडे आल्या आहेत. अशा तक्रारी अर्जात अनेक नात्यांतील लोक असतात. अशा आरोपींना शोधण्यात सायबर सेलला १०० टक्के यश आले आहे.------------------------चोवीस तासांत असे    मिळतात पैसे एखाद्या नागरिकाची आॅनलाईन पैसे भरुन फसवणूक झाल्यास बँकेचे स्टेटमेंट सायबर सेलकडे घेऊन आल्यास ट्रान्झक्शन कुठे झाले, ते पैसे कुठल्या वॅलेटवर  जमा आहेत, संबंधित वॅलेटला सायबर सेलमार्फत मेल पाठविला जातो. त्यानंतर जर त्या वॅलेटवर पैसे शिल्लक असतील तर संबंधित तक्रारदाराच्या खात्यावर ते पैसे परत करण्यात येतात. त्यासाठी नागरिकांनी चोवीस तासांत सायबर सेलशी संपर्क करण्याची गरज आहे.------------------नागरिकांचे दुर्लक्ष.........अनोळखी माणसांना आपल्या एटीएमचा नंबर देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी अनेकदा केले आहे.मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून लोक आपला नंबर अनोळखी लोकांकडे देत आहेत. कुठल्याही बँकेचा मॅनेजर फोनवरून एटीएम नंबर विचारत नाही. त्यामुळे अशा बोलण्याला नागरिक फसले नाहीत तर खात्यातून परस्पर पैसे काढण्यासारखे प्रकार होणारच नाहीत. पण  त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळेच असे प्रकार करणाºयांना रान मोकळे मिळते. याबाबत वारंवार बँकांकडून जागृती केली जाते. महिना    गहाळ व     सापडलेले      चोरी    मोबाईलजानेवारी    ७०    ३४फेब्रुवारी    ४०    २२मार्च    ६०    २६एप्रिल    ०४    ०१मे    ३७    ०४जून    २५    ०१जुलै    ३०    ०३आॅगस्ट    १६    ०१सप्टेंबर    २९    ०२आॅक्टोबर    १३    ०४नोव्हेंबर    २४    १२एकूण    ३४८    ११०

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस