शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढा कारागृहातील २८ कैद्यांसह एक पोलीस, दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 07:26 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात कोरोना चे रुग्ण वाढलेग्रामीण पोलीस व आरोग्य विभाग सतर्क

मंगळवेढा : मल्लिकार्जुन देशमुखे

कोरोनासारख्या संकट काळात जिवाची पर्वा न करता मागिल चार महिन्यापासून रात्रंदिवस झ़टणाऱ्या ग्रामीण  पोलिस दलात कोरोनाने शिरकाव केला आहे. मंगळवेढा पोलिस ठाण्यातील एक अधिकारी व दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्याचबरोबर पोलीस ठाण्याबरोबर कारागृहातही कोरोनाने मोठा शिरकाव केला असून तब्बल २८ कैदी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. दरम्यान कोव्हिडं योद्धा असणारे डॉक्टर बरोबर पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनासमोर संकट वाढले आहे.

  शहरासह तालुक्यातील  ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट बनत चालला असून को कोरोनाची लागण झाल्यानंतर आता  कारागृहात व पोलीस ठाण्यात  कोरोनाचा  शिरकाव झाला आहे. शुक्रवारी कैदी, पोलीस बरोबर ११९ जणांची  रॅपिड टेस्ट घेण्यात आली.  यामध्ये ४० कैदी पैकी २८   पॉझिटिव्ह आढळले तर १२ निगेटिव्ह आढळले तसेच कैद्यांना जेवणाचे डबे देणारा एकजण पॉझिटिव्ह आला आहे. 

पोलिसांच्या  घेण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये एक पोलीस अधिकारी व दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले. यामुळे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी तातडीने उपाययोजना करण्यासाठी वरीष्ठ पातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. 

 कारागृह प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडून गत तीन महिन्यांपासून कोरोनाला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू होते; मात्र शुक्रवारी रात्री कारागृहातील सुमारे २८  कैद्यांना व ३ पोलिसांना कोरोना असल्याचा अहवाल  पॉझीटीव्ह असल्याचे समोर येताच प्रशासनाला धक्का बसला. आता खबरदारी म्हणूण कैद्यांसाठी स्वतंत्र कोवीड सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहे. या ठिकाणावरुन कैदी पळून जाणार नाहीत, तसेच त्यांना उपचारही मिळावे, या दृष्टीने त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, तर १२ निगेटिव्ह कैद्यांना नवीन तहसील कार्यालयात तात्पुरते जेल स्थापन करून विलगिकरण करण्यात आले आहे. यामध्ये न्यायालयीन कोठडीतील पाच पुरुष व दोन महिला व पोलीस कोठडीतील पाच पुरुष कैदी असा १२ जणांचा समावेश आहे आतापर्यंत ग्रामीण व  शहराच्या विविध भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्य वाढतीच होती; मात्र आता पोलिस व  कारागृहातही कोरोनाने  शिरकाव केल्यामुळे पोलिस प्रशासनावर मोठे संकट आले आहे. तर सलगर येथील डॉक्टरांच्या संपर्कातील एक परिचारिका व एक लिपिक असे दोघेजण पॉझिटिव्ह आढळले आहे. ______________________________

मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयमध्ये शुक्रवारी ११९ रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या, यामध्ये २८ कैदी, एक पोलीस अधिकारी व दोन सुरक्षा रक्षक व एक आहार पुरवठादार असे ३२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. १२ कैदीचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यांना तहसील कार्यालय येथे जेल स्थापन करून विलगीकरण केले आहे. - उदयसिंह भोसले, उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस