कारच्या अपघातात एकजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST2020-12-27T04:16:54+5:302020-12-27T04:16:54+5:30

लोटेवाडी-सातारकर वस्ती येथील उत्तम मारुती खांडेकर यांचे महूद येथे कापड दुकान आहे. ते कापड दुकान मुलगा विक्रम खांडेकर ...

One person was killed on the spot in a car accident | कारच्या अपघातात एकजण जागीच ठार

कारच्या अपघातात एकजण जागीच ठार

लोटेवाडी-सातारकर वस्ती येथील उत्तम मारुती खांडेकर यांचे महूद येथे कापड दुकान आहे. ते कापड दुकान मुलगा विक्रम खांडेकर चालवीत होता. शुक्रवारी रात्री उशिरा दुकान बंद करून विक्रम खांडेकर (एमएच ४५ /३००१) कारमधून घराकडे परत निघाला होता. त्याची कार अचकदाणी-लोटेवाडी रस्त्याने भरधाव जात असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यामध्ये कारने तीन ते चार पलट्या मारल्यामुळे विक्रम खांडेकर कारच्या बाहेर फेकल्या गेल्याने त्याच्याच अंगावर कार खाली तो अडकून पडला होता. कारच्या आवाजामुळे तानाजी सावंत, बाबा कारंडे यांनी विक्रम खांडेकर यांच्या अंगावरील कार बाजूला काढून त्यास उपचारासाठी सांगोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मयत झाल्याचे सांगितले. याबाबत सांगोला पोलिसांत अद्याप नोंद झालेला नाही.

Web Title: One person was killed on the spot in a car accident