चारचाकी-दुचाकी अपघातात एकजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST2021-07-16T04:16:34+5:302021-07-16T04:16:34+5:30

कमलापूर-देवळेमळा (ता. सांगोला) येथील धनाजी दत्तात्रय वाघमारे १२ जुलै रोजी सायं. ६ च्या सुमारास एमएच ४५ /आय ३६१२ या ...

One person was injured in a four-wheeler accident | चारचाकी-दुचाकी अपघातात एकजण जखमी

चारचाकी-दुचाकी अपघातात एकजण जखमी

कमलापूर-देवळेमळा (ता. सांगोला) येथील धनाजी दत्तात्रय वाघमारे १२ जुलै रोजी सायं. ६ च्या सुमारास एमएच ४५ /आय ३६१२ या दुचाकीवरून लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथे पत्नीला घरी आणण्यासाठी निघाले होते. ते सायं. ७ च्या सुमारास सांगोल्याच्या पुढे वाढेगाव रोडवरील बंधन पॅलेसजवळ आले असता चारचाकी टेम्पोने लाईट मारल्यामुळे त्यांना पुढचे काही दिसले नाही. त्यातच चालकाने उजव्या साईडला कट मारल्यामुळे ते दुचाकीसह रोडच्या कडेला जाऊन पडले. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ, उजव्या हाताच्या करंगळीला, डोक्यास व उजव्या कोपराजवळ जबर मार लागल्यामुळे जखमी झाले. अज्ञात व्यक्तीने त्यांना उपचारासाठी सांगोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दुचाकीचे सुमारे ५ हजार रुपयाचे नुकसान झाले. याबाबत धनाजी वाघमारे यांनी अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: One person was injured in a four-wheeler accident