शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

Breaking: कोरोनाने सोलापुरात एकाचा मृत्यू; एकाच दिवशी आढळले ८ रूग्ण

By appasaheb.patil | Published: March 14, 2023 6:59 PM

कोरोनाने सोलापुरात एकाचा मृत्यू झाला असून एकाच दिवशी ८ रूग्ण आढळले आहेत. 

सोलापूर : सोलापूर शहरात एकाच दिवशी ८ रूग्ण आढळून आले. दरम्यान, शहरातील एका ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अहवालात झाली आहे. सध्या सोलापुरातील कोरोना रूग्णांची संख्या १५ इतकी झाली आहे. 

सोमवारी १२६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाला. त्यात रॅपिड ॲन्टीजेन टेस्टचे २८ तर आरटीपीसीआर टेस्ट ९८ जण होते. त्यापैकी ११८ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात तीन पुरूष तर ५ महिलांचा समावेश आहे. 

मयत झालेली व्यक्ती ही बुबणे चाळ, रेल्वे लाईन परिसरातील आहे. मयताचे वय ८० असून त्यांना दमा, पक्षाघात  असल्याने त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना ११ मार्च २०२३ रोजी पहाटे शासकीय रूग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोलापुरातील कोरोनाची रूग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे.

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या