अक्कलकोटजवळ झालेल्या अपघातात एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:23 AM2021-05-09T04:23:24+5:302021-05-09T04:23:24+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी सायंकाळी अक्कलकोटहून चप्पळगावकडे दुचाकी एमएच १३ बीएक्स ४४३५ यावरून निघाले होते. समोरून आलेल्या ...

One killed, one injured in accident near Akkalkot | अक्कलकोटजवळ झालेल्या अपघातात एक ठार, एक जखमी

अक्कलकोटजवळ झालेल्या अपघातात एक ठार, एक जखमी

Next

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी सायंकाळी अक्कलकोटहून चप्पळगावकडे दुचाकी एमएच १३ बीएक्स ४४३५ यावरून निघाले होते. समोरून आलेल्या ट्रकने एमएच १३ सीयू ४८६४ ने धडक दिली असता, दुचाकीवरील रोहन हे जागीच ठार झाले. काझीकणबस येथील कल्याणी बसवराज मुनाळे हे गंभीर जखमी झाले.

जखमीला सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले. अजिंक्य अशोक कांबळे रा. खासबाग अक्कलकोट यांनी फिर्याद दिली असून, अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड हे करीत आहेत. या घटनेतील ट्रक चालक दत्तात्रय सिद्राम बंडगर रा.मुरारजी पेठ सोलापूर यास पोलिसांनी अटक केली आहे.

पूणवेळ नोकरीची ऑर्डर

जखमी कल्याणी मुनाळे हा मागील तीन वर्षांपासून अक्कलकोट एमएसईबी येथील कार्यालयात ऑपरेटर म्हणून काम करीत आहेत. नुकतेच पूर्णवेळची ऑर्डर आली आहे. ट्रक बाह्यवळण रस्त्यावरून वागदरीकडे जात होती. अचानकपणे नवीन पुलाजवळ अपघात झाला आहे. यात मोटारसायकलवरील दोघांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Web Title: One killed, one injured in accident near Akkalkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app