अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:19 IST2021-04-26T04:19:30+5:302021-04-26T04:19:30+5:30

मंगळवेढा-सांगोला रोडवरील बोगद्याजवळ सांगोलाकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्यामुळे एक जण ठार तर एक जण जखमी ...

One killed in collision with unknown vehicle; One injured | अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार; एक जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार; एक जखमी

मंगळवेढा-सांगोला रोडवरील बोगद्याजवळ सांगोलाकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्यामुळे एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

देवळे (ता. सांगोला) येथील बाळू विठोबा अंकुशराव (वय ६५) व त्यांचे नातू प्रवीण प्रकाश अंकुशराव हे दोघे कामानिमित्त शनिवारी (दि. २४) मंगळवेढा येथे आले होते. बाळू विठोबा अंकुशराव यांना दुचाकी चालवता येत नसल्याने नातू प्रवीण यांना सोबत घेऊन आले होते. मात्र, काम उरकून परत गावाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला (क्र. एमएच १२/ केएच ८३१२) पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने बोगद्याजवळ जोराची धडक दिली. यामध्ये बाळू अंकुशराव हे जागेवरच ठार झाले. त्यांचा नातू प्रवीण अंकुशराव हा गंभीर जखमी झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार निंबाळे करत आहेत.

Web Title: One killed in collision with unknown vehicle; One injured