विषारी औषध प्यायल्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST2021-05-06T04:23:35+5:302021-05-06T04:23:35+5:30
नाना नारायण माने ४ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास नेहमीप्रमाणे कुटुंबासमवेत जेवण करून घरासमोर झोपले होते, तर ...

विषारी औषध प्यायल्याने एकाचा मृत्यू
नाना नारायण माने ४ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास नेहमीप्रमाणे कुटुंबासमवेत जेवण करून घरासमोर झोपले होते, तर मुलगा गणेश घरास आतून कडी लावून झोपला होता. दरम्यान, ५ मे रोजी स. ६ वाजता नाना माने यांनी झोपेतून उठून जनावरांच्या गोठ्यातील साफसफाई केली व मुलगा गणेश यास उठविण्यासाठी आवाज दिला. त्याने आतून प्रतिसाद दिला नाही, म्हणून त्यांनी पाठीमागील खिडकीतून गणेशला आवाज दिला. यानंतरही त्यांने कोणताही प्रतिसाद दिला नाही. शेवटी भाऊ पांडुरंग माने यांच्यासह प्रकाश तेली, शनी भुईटे, अजित माने, कैलास शिंदे यांना बोलावून घेऊन दरवाजा कटावणीच्या साहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. यावेळी गणेश झोपलेल्या बाजूस विषारी औषधाची बाटली पडल्याचे निदर्शनास आले. त्याला हलवून पाहिले असता, त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. याबाबत वडील नाना माने यांनी सांगोला पोलिसात खबर दिली.