सांगोला-मिरज बायपासवर एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST2020-12-05T04:44:31+5:302020-12-05T04:44:31+5:30

बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास जुनोनी (ता.सांगोला) बायपास रोडवर ही घटना घडली. सोलापूर- सांगली राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत सांगोला- ...

One beaten on Sangola-Miraj bypass | सांगोला-मिरज बायपासवर एकास मारहाण

सांगोला-मिरज बायपासवर एकास मारहाण

बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास जुनोनी (ता.सांगोला) बायपास रोडवर ही घटना घडली.

सोलापूर- सांगली राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत सांगोला- मिरज नव्याने जुनोनी बायपास महामार्गावर एका बिल्डकाॅन कंपनीकडून रस्त्याचे काम सुरू आहे. त्यांची वाहने संबंधित गटात थांबविली जात होती. दरम्यान, बापू व्हनमाने याने जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने वाहने थांबविण्यास विरोध केला. मधुकर शंकर व्हनमाने यांनी ‘तुमची येथे शेती किंवा काही संबंध नाही’ असे म्हणत समाधान एकनाथ सरगर, गोदाबाई एकनाथ सरगर ,मधुकर शंकर व्हनमाने, पोपट श्रीमंत व्हनमाने ,सुबाबाई श्रीमंत व्हनमाने यांनी संगनमत करून बापू व्हनमाने यास शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील दगड, काठीने मारहाण करून जखमी केले. याबाबत बापू विलास व्हनमाने (रा.जुनोनी) यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: One beaten on Sangola-Miraj bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.