लाच घेताना एकास अटक
By Admin | Updated: April 17, 2017 16:08 IST2017-04-17T16:08:06+5:302017-04-17T16:08:06+5:30
.

लाच घेताना एकास अटक
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १७ : ओव्हरटाईम व प्रवास भत्ता बिल मंजूर करण्याच्या कामासाठी १५०० रूपये लाच स्वीकारताना लघु पाटबंधारे विभाग क्र १ कार्यालयातील वरिष्ठ क्लार्क यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़
नागनाथ मारूती बनसोडे (वय ५६) असे लाच घेणाऱ्या क्लार्कचे नाव आहे़ तक्रारदार हा लघु पाटबंधारे विभाग कार्यालय क्र १ येथे चालक या पदावर काम करीत आहे़ तक्रारदाराचे ओव्हरटाईम, प्रवास भत्ता बिल मंजूर करून देण्यासाठी नागनाथ बनसोडे यांनी तक्रारदाराकडे एकूण बिलाच्या १५ टक्के रक्कम म्हणजेच ७ हजार ३०० रूपये लाचेची मागणी केली होती़ या लाचेचा पहिला हफता १५०० रूपये नागनाथ बनसोडे हे स्वत: स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ याप्रकरणी नागनाथ बनसोडे यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे़ ही कारवाई पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर यांच्या पथकाने केली आहे़