शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

कचऱ्यापासून दररोज दीड मेगावॅट वीज निर्मिती

By admin | Published: July 08, 2016 8:07 PM

महापालिकेने बीओटीवर (बांधा वापरा हस्तांतरीत करा) राबविलेल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पातून दररोज दीड मेगॅवॅट वीज निर्मिती होत आहे. राज्यातील हा एकमेव पथदर्शी प्रकल्प आहे.

राजकुमार सारोळे

सोलापूर : महापालिकेने बीओटीवर (बांधा वापरा हस्तांतरीत करा) राबविलेल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पातून दररोज दीड मेगॅवॅट वीज निर्मिती होत आहे. राज्यातील हा एकमेव पथदर्शी प्रकल्प आहे. महापालिकेने २00८ मध्ये मुंबईतील आॅरगॅनिक्स रिसायकलिंग सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प राबविण्यास परवानी दिली. कंपनीचे कार्यकारी संचालक सुहास भांड यांच्या मार्गदर्शनाखाली २00९ मध्ये तुळजापूर रस्त्यावरील कचरा डेपोजवळ प्रकल्प उभारणीस सुरूवात केली. प्रकल्प अभियंता विक्रम देशमुख यांनी ९ एकर जागेवर ४५ कोटी खर्चुन ३ मेगॅवॅट वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली. गेल्या तीन वर्षापासून दररोज १ ते दीड वॅट वीज निर्मिती यशस्वीपणे सुरू झाली आहे.सरव्यवस्थापक राम माथूर व तांत्रिक व्यवस्थापक राजीव यादव यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. ३ मेगॅवॅट वीज प्रकल्पासाठी दररोज ४00 टन ओला व सुका कचरा आवश्यक आहे. पण महापालकेच्या यंत्रणेकडून दररोज दीडशे दोनशे टन कचरा उपलब्ध केला जातो. पहिल्या टप्प्यात या कचऱ्यातून दगड, माती, कापड, प्लॉस्टिक पिशव्या बाहेर काढल्या जातात. दुसऱ्या टप्प्यातही ही विलगीकरण प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात कचरा बारिक करून चाळणीद्वारे दोन भाग केले जातात. त्यात एकदम बारीक झालेला कचरा गॅस टाकीत नेला जातो तर दुसरा भाग खत निर्मिती विभागात जमा केला जातो. कचऱ्यापासून मिथेन गॅसची निर्मिती करून यावर दोन इंजीन चालवून वीज निर्मिती केली जाते. कंपनीने पूर्वी तीन इंजीन बसविले आहेत. आता चौथे इंजिन आणण्यात आले आहे. शहरात सध्या कचरा संकलनाची समस्या आहे. कचरा वाढला की प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालेल अशी कंपनीची आशा आहे. सोलापुरात विडी उद्योग असल्याने तेंदूच्या पानाचा कचरा मोठ्या प्रमाणावर मिळतो. राज्यात इतर दोन ठिकाणी असे प्रयोग झाले पण यश्स्वी झालेले नाहीत. *कंपोस्ट खताची निर्मिती***कचऱ्यापासून गॅस निर्मितीबरोबरच उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत बनते. झुआरी कंपनी हे खत खरेदी करीत आहे. याशिवाय तीन हजार रुपये टनाप्रमाणे शेतकऱ्यांनाही थेट हे खत खरेदी करता येते. सोलापूर इंटसिटीवर असलेले इंजीन चालक देशमुख यांनी आपल्या लांबोटी येथील शेतात या कंपोस्ट खतावर केळीची बाग चांगल्या प्रकारे फुलविली आहे.