शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी यात्रेसाठी ७ जुलैपासून १८ दिवस घेता येणार विठ्ठलाचे २४ तास दर्शन; मंदिर प्रशासनाचा निर्णय 

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 18, 2024 16:56 IST

आषाढी यात्रेसाठी दोन हजार कर्मचारी, स्वयंसेवकांची नियुक्ती.

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : १७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी सोहळा होत आहे. यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या यात्रेला भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन ७ ते २४ जुलै दरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

यावेळी शेळके म्हणाले, येणाऱ्या भाविकांना सुलभ व तत्काळ दर्शन व्हावे, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. दर्शन रांग, पत्रा शेड, दर्शन मंडप येथे भाविकांना अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी २ हजार कर्मचारी, स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे.

यावेळी दर्शनरांग व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, यात्रेतील प्रथा व परंपरा, सुरक्षा व्यवस्था, दर्शन रांगेतील अन्नदान, वैद्यकीय व्यवस्थेचे स्टॉल, स्वच्छता व्यवस्था, शासकीय महापूजा, लाइव्ह दर्शन व्यवस्था, देणगी व्यवस्था, निवास व्यवस्था, अपघात विमा पॉलिसी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही व वायरलेस यंत्रणा, लाडू प्रसाद व्यवस्था, महिलांसाठी चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष व विश्रांती कक्ष आदी व्यवस्थेचा आढावा घेऊन आषाढी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनास केल्याची माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी