एमआयएमच्या वतीने महापालिका प्रवेशद्वारासमोर टॅक्सच्या पावत्या जाळल्या
By Appasaheb.patil | Updated: August 14, 2023 19:34 IST2023-08-14T19:34:07+5:302023-08-14T19:34:33+5:30
सोलापूर शहरातील अनेक मिळकतदारांना महापालिका प्रशासनाने नळ नसतानाही खासगी नळाची पाणीपट्टी आकारणी केली आहे.

एमआयएमच्या वतीने महापालिका प्रवेशद्वारासमोर टॅक्सच्या पावत्या जाळल्या
सोलापूर : ऑल इंडिया मजलीस ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या वतीने शहर व जिल्हा अध्यक्ष हाजी फारूक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली नळ नसतानाही दिलेल्या पाणीपट्टी बिलाची महापालिका प्रवेशद्वारासमोर होळी करण्यात आली.
सोलापूर शहरातील अनेक मिळकतदारांना महापालिका प्रशासनाने नळ नसतानाही खासगी नळाची पाणीपट्टी आकारणी केली आहे. तसेच मीटरची सक्ती करण्यात येत आहे. ते चुकीचे व अन्यायकारक आहे. शहर व हद्दवाढ भागात अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहे. रस्ते खराब झालेले आहेत. नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. शहरातील रस्ते तातडीने करावे. शहरातील विविध ठिकाणी ड्रेनेज तुंबत असल्या कारणाने ड्रेनेज मधील घाण पाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात सध्या अतिक्रमण काढण्याची मोहिम चालू आहे. जिथे अतिक्रमणला अडचण येणार नाही, तिथले अतिक्रमण काढू नये असेही म्हटले आहे.
यावेळी कोमारो सय्यद, गाझी जहागीरदार, वाहेदा बंडाले, राजा बागवान, जुबेर शेख, मच्छिंद्र लोकेकर, अझहर जहागीरदार, सचिन कोलते, नसीम खलीपा, हरिस कुरेशी, सत्तार पैलवान, मोहसिन मैंदर्गी, नसीमा कुरेशी, अ.रहमान मोहोळकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.