दारु प्यायला पैसे न दिल्याने वृद्धाचे दात पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:24 IST2021-02-24T04:24:15+5:302021-02-24T04:24:15+5:30

करमाळा : दारू प्यायला पैसे देत नसल्याच्या कारणावरुन खडकी (ता.करमाळा) येथील वृध्दास एका मद्यपीने बरगडी, कपाळावर मारहाण करुन दोन ...

The old man's teeth were knocked out for not paying for alcohol | दारु प्यायला पैसे न दिल्याने वृद्धाचे दात पाडले

दारु प्यायला पैसे न दिल्याने वृद्धाचे दात पाडले

करमाळा : दारू प्यायला पैसे देत नसल्याच्या कारणावरुन खडकी (ता.करमाळा) येथील वृध्दास एका मद्यपीने बरगडी, कपाळावर मारहाण करुन दोन दात पाडल्याची घटना घडली.

हा प्रकार १९ फेब्रुवारीला दुपारी अडीच वाजता खडकी गावात घडला आहे. या प्रकरणी भाऊसाहेब आण्णासाहेब सूळ (वय ६०, रा. ,खडकी, ता. माढा) यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी रमेश लक्ष्मण गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

१९ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता वरव्याचे दूध देऊन भाऊसाहेब हे घराकडे निघाले होते. खडकी गावातील मराठी शाळेजवळ रमेश गायकवाड याने भाऊसाहेब सूळ याला अडविले. यावेळी त्याने त्यांच्याकडे दारुसाठी पैसे मागितले. त्यावेळी ते जवळ पैसे नाहीत म्हणाले असता त्याने घरात ओढत नेले. दरवाजाला आतून कडी लावून शिवीगाळ करून वीटेने तोंडावर आणि डोक्यावर मारहाण केली. त्यानंतर लोखंडी गजाने बरगडीवर, कपाळावर व तोंडावर मारहाण केली. त्यात त्यांचे दोन दात तुटले. कपाळाला मार लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The old man's teeth were knocked out for not paying for alcohol