लोटेवाडीत वृद्धावर कुऱ्हाडीच्या दांड्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:26 IST2021-09-04T04:26:54+5:302021-09-04T04:26:54+5:30

सांगोला : शेतातील चिलाराची झाडे तोडण्याच्या कारणावरून चिडून जाऊन दोघांनी लोटेवाडीत नारायण नामदेव शेंबडे या वृद्धाच्या उजव्या हाताच्या पोटरीवर ...

An old man was attacked with an ax in Lotewadi | लोटेवाडीत वृद्धावर कुऱ्हाडीच्या दांड्याने हल्ला

लोटेवाडीत वृद्धावर कुऱ्हाडीच्या दांड्याने हल्ला

सांगोला : शेतातील चिलाराची झाडे तोडण्याच्या कारणावरून चिडून जाऊन दोघांनी लोटेवाडीत नारायण नामदेव शेंबडे या वृद्धाच्या उजव्या हाताच्या पोटरीवर आणि डोक्यात कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारून जखमी केले.

गुरुवारी (दि. २) सायंकाळी ६ च्या सुमारास हा प्रकार घडला. नारायण शेंबडे हे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या शेतातील चिलाराची झाडे तोडत होते. इतक्यात राजाराम वामन ढेरे हा आला आणि माझ्या शेतातील चिलाराची झाडे तोडू नको असे म्हणाला असता त्यांनी मी माझ्या शेतातील झाडे तोडत असल्याचे समजावत होते.

राजाराम ढेरे व संदेश ढेरे (रा. दोघेही नवी लोटेवाडी) हे दोघेजण यांनी चिडून जाऊन शिवीगाळ करून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना पाठीमागून चिलाराच्या झाडामध्ये ढकलून हातातील कुऱ्हाड हिसकावली. संदेश ढेरे याने त्यांना पकडून कुऱ्हाडीच्या दांडक्याने त्यांच्या उजव्या हाताच्या पोटरीवर व डोक्यात मारहाण करून जखमी केले.

Web Title: An old man was attacked with an ax in Lotewadi