टँकर अंगावरून गेल्याने वृद्ध जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:41 IST2021-03-04T04:41:03+5:302021-03-04T04:41:03+5:30

सांगोला : दूध वाहतूक करणाऱ्या भरधाव टॅंकरने समोरून जोराची धडक दिल्याने पादचारी वृद्ध जागीच ठार झाला. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या ...

The old man died on the spot when the tanker overtook him | टँकर अंगावरून गेल्याने वृद्ध जागीच ठार

टँकर अंगावरून गेल्याने वृद्ध जागीच ठार

सांगोला : दूध वाहतूक करणाऱ्या भरधाव टॅंकरने समोरून जोराची धडक दिल्याने पादचारी वृद्ध जागीच ठार झाला. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात महूद- सांगोला रोडवरील वाकी शिवणे चौकात घडला. आप्पासो ज्ञानू गवळी (५९, रा. वाकीशिवणे) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

अपघातानंतर चालक टँकर घेऊन पळून जात असताना ग्रामस्थांनी पाठलाग करून त्यास पकडले.

याबाबत इंदापूर येथील सोनाई दूध संघाचा टँकर (क्र. एमएच ४५ -२०२१) हा सांगोला (कमलापूर) येथील एमआयडीसीतून दूध भरून सांगोला ते इंदापूर निघाला होता. दरम्यान, टँकर महूद- सांगोला रोडवरील वाकी शिवणे गावातून भरधाव जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूने येणाऱ्या पादचारी वृद्धाला समोरून जोराची धडक देऊन टँकर अंगावरून गेल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर चालक टँकर न थांबवताच वेगाने निघाला होता. ग्रामस्थांनी पाठलाग करून गावापासून १ किमी अंतरावर त्यास पकडले.

याबाबत भारत सुखदेव गवळी (रा. वाकी शिवणे) यांनी खबर दिली. पोलिसांनी टँकर चालक शशिकांत नंदकुमार देवकर (रा. सरस्वती चौक, इंदापूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: The old man died on the spot when the tanker overtook him