शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
2
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
3
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
4
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
5
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
6
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
7
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
8
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
9
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
10
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
11
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
12
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
13
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
14
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
15
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
16
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
17
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
18
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
19
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
20
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात जिल्हा उपनिबंधकासह अनेकांच्या दांड्या, वारंवार नोटिसा देऊनही अधिकाºयांना काहीही फरक पडेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:43 PM

जिल्ह्यातील विविध विभागांकडील तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनाला अनेक खात्याच्या विभागप्रमुखांनी दांडी मारली.

ठळक मुद्देअपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत तीन प्रकरणांचा आढावा घेण्यात आलाबेगमपूर येथील बाबुराव सतपाल यांनी विद्युत खांब आणि रोहित्र बसविल्याचे भाडे मिळण्याबाबत, रघुराज उपरे यांनी मुदत ठेवीची रक्कम मिळण्याबाबत अर्जजिल्हा पुनर्वसन कार्यालयाबद्दल सध्या अनेक तक्रारी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : जिल्ह्यातील विविध विभागांकडील तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनाला अनेक खात्याच्या विभागप्रमुखांनी दांडी मारली. पंचायतराज समितीच्या दौºयामुळे जिल्हा परिषदेकडील अधिकारी बैठकांमध्ये व्यस्त होते तर इतर विभागांकडेही कारणे तयार होती. या अधिकाºयांना याबाबत नोटिसा बजावण्यात येणार आहेत. अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत तीन प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यात बेगमपूर येथील बाबुराव सतपाल यांनी विद्युत खांब आणि रोहित्र बसविल्याचे भाडे मिळण्याबाबत, रघुराज उपरे यांनी मुदत ठेवीची रक्कम मिळण्याबाबत अर्ज केला होता. पाथर्डी घोटी (ता. करमाळा) येथील चांगदेव वाघे यांनी शेतीच्या कामासाठी विद्युत कनेक्शन मिळण्याबाबत अर्ज केला होता. या तक्रारींचे निवारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ जिल्हा पुनर्वसन कार्यालयाबद्दल सध्या अनेक तक्रारी आहेत. परंतु, या तक्रारींचे निवारण होत नाही. लोकशाही दिनातही पळसदेव (ता. इंदापूर) येथील रामदास काळे यांनी पर्यायी जमिनीचा ताबा मिळण्याबाबत तर हणुमंत भोसले  (रा. सरकोली, ता. पंढरपूर) यांनी उताºयावर पेन्सिलने लिहिलेले शेरे कमी करण्याबाबत अर्ज दिला. यावर कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकाºयांनी दिले.-----------------------पोलिसांवर कारवाई कराकुरुल, ता. मोहोळ येथील मारुती जाधव यांनी तीन तक्रारी केल्या. यात पेनूर येथील घरकूल घोटाळाप्रकरणी ग्रामसेवक आणि लाभार्थ्यांवर कारवाई करावी. मोहोळच्या पोलीस निरीक्षकांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, कुरुल पंचायत समिती सदस्यांवर ग्रामपंचायत कर न भरल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली. कोरवली, ता. मोहोळ येथील महादेव म्हमाणे यांनी ग्रामसेवकाच्या कारभाराची चौकशी करावी आणि घरकूल विक्रीबाबत ग्रामसेवकाने केलेल्या आदेश भंगप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. -------------------------यांना बजावणार नोटिसाजातपडताळणी कार्यालय, सहायक धर्मादाय आयुक्त, उपवनसंरक्षक, कार्यकारी अभियंता लाभक्षेत्र प्राधिकरण, कार्यकारी अभियंता उजनी कालवा क्र. ८, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण, अधिष्ठाता वैद्यकीय रुग्णालय यांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय