पंढरपुरात मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; भाजप नेत्याच्या तोंडाला काळे फासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:20 IST2021-02-07T04:20:49+5:302021-02-07T04:20:49+5:30
शेतकरी व सामान्य जनतेची वीजबिल माफी करण्यासंदर्भात महाविकास आघाडीविरुद्ध पंढरपूर येथे भाजपच्या वतीने वीज महावितरणच्या कार्यालयाच्या फाटकाला टाळे ठोको ...

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; भाजप नेत्याच्या तोंडाला काळे फासले
शेतकरी व सामान्य जनतेची वीजबिल माफी करण्यासंदर्भात महाविकास आघाडीविरुद्ध पंढरपूर येथे भाजपच्या वतीने वीज महावितरणच्या कार्यालयाच्या फाटकाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे माजी पदाधिकारी शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध टीकास्त्र सोडले होते.
याबाबतचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी व्हायरल झाला.
त्यानंतर शिवसेनेचे तालुका संघटक संदीप केंदळे, सचिन खंकाळ, नितीन शिंदे, भैया पवार यांच्यासह शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. शिरीष कटेकर यांच्या घराजवळ जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासले.
----
माफीचा व्हिडिओही व्हायरल
त्याचबरोबर कटेकरांना चालवत विठ्ठल मंदिराच्या श्री संत नामदेव पायरीजवळ आणण्यात आले. तेथे कटेकर यांनी शिवसेनेची व मुख्यमंत्र्यांची माफी मागितली. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे.
-----
फोटो : ०६पंढरपूर-आंदोलन
माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या तोंडाला काळे फासून विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळ घेऊन येताना शिवसैनिक.