महापरिनिर्वाण दिनानिमित्त “एक पत्र बाबासाहेबांना...’’ उपक्रमाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST2020-12-05T04:46:23+5:302020-12-05T04:46:23+5:30

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त “एक पत्र बाबासाहेबांना...” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कबीरा सोशल ...

On the occasion of Mahaparinirvana Day, "A letter to Babasaheb ..." was organized | महापरिनिर्वाण दिनानिमित्त “एक पत्र बाबासाहेबांना...’’ उपक्रमाचे आयोजन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त “एक पत्र बाबासाहेबांना...’’ उपक्रमाचे आयोजन

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त “एक पत्र बाबासाहेबांना...” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कबीरा सोशल फाउंडेशनतर्फे हा उपक्रम घेतला जात आहे.

दरवर्षी सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येते. मुंबई येथील चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी संपूर्ण भारतातून अनुयायी एकत्र येत असतात. परंतु, यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादनासाठी मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर कबीरा सोशल फाउंडेशनतर्फे ‘‘एक पत्र बाबासाहेबांना...’ या अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्याचा संकल्प केला आहे.

सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पत्रपेटी ठेवण्यात आली आहे. यामध्ये बाबासाहेबांना अभिवादनपर संदेश लिहावा किंवा आपल्या भावनांना पत्रातून वाट मोकळी करावी, यासाठी पत्र लिहून पाठविण्याचे आवाहन केले आहे.

–---

फोटो : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ठेवण्यात आलेली पत्रपेटी.

*****

Web Title: On the occasion of Mahaparinirvana Day, "A letter to Babasaheb ..." was organized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.