शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सोलापुरात ढगांचे निरीक्षण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 02:47 IST

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरॉलॉजी (आयआयटीएम) तर्फे ‘कायपिक्स’ (क्लाऊड एअरोसॉल इंटरअ‍ॅक्शन अँड प्रेसिपिटेशन एन्हान्समेंट एक्सपेरिमेंट) नावाचा प्रयोग करण्यात येत आहे.

सोलापूर : कृत्रिम पावसासाठी अनुकुल असणाऱ्या ढगांच्या निरीक्षणास सोलापुरात मंगळवारी दुपारी सुरूवात झाली. भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) यांच्यावतीने या ढगांचे निरीक्षण सुरू आहे. या निरीक्षणासाठी आलेल्या विमानाने आज उड्डाण करीत सुमारे दोन तास अभ्यास केला.

मंगळवारी सकाळी तांत्रिक कारणास्तव विमानाचे उड्डाण होऊ शकले नाही. दुपारी २०० किमी त्रिज्याच्या क्षेत्रात ढग आणि पावसाचे परीक्षण करण्यासाठी एका विमानाने उड्डाण घेतले. दोन तासांच्या निरीक्षणानंतर हे विमान परत जमिनीवर आले. या विमानाने ढगातील आर्द्रतेचा अंदाज घेतला. गेल्या चार दिवसांपासून चार विमाने सोलापूर विमानतळावर उभी आहेत. अर्थात अनुकूल ढगनिर्मिती झाल्यानंतरच त्यांचे उड्डाण होईल.

कायपिक्स ४ ग्राऊंड कॅम्पेन या नावाने या प्रयोगाची सुरूवात मे २०१७ पासून सुरू करण्यात आली आहे. पावसाचे निरीक्षण करण्यासाठी या क्षेत्रावर १२० पाऊसमापी यंत्रे वापरुन एक नेटवर्क तयार केले आहे. सोलापूर कमी पर्जन्यछायेचा प्रदेश असल्याने याची निवड करण्यात आली. मात्र ढगांची निर्मिती होत नसल्याने प्रयोगात अडचणी येत आहेत.

रडार रेंजमध्ये विमान निरीक्षणासाठी मूळ स्थान म्हणून सोलापूर निवडले गेले आहे. वैज्ञानिक क्लाऊड सिडिंग प्रयोग-२०१८ ने कृत्रिम पावसासंदर्भात काही निरीक्षण केले. २०१९ मधील मुख्य प्रयत्न सोलापूरच्या उत्तर व दक्षिण भागातील रडार रेंजमध्ये असतील. या प्रयोगाद्वारे तयार केलेली सर्व वैज्ञानिक माहिती कॅल्शियम क्लोराईड फ्लेयर्स वापरुन क्षेत्रावरील हायग्रोस्कोपिक क्लाऊड सिडिंगची उपयुक्तता तपासण्यात उपयोगी ठरणार आहे. त्यानुसार, विमानाच्या मदतीने क्लाऊड बेसजवळ सिडिंग केले जाणार आहे.रडार, पाऊसमापी यंत्रे आणि विमान निरीक्षणाद्वारे केल्या जाणाºया प्रयोगाचे पुढील मूल्यांकन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस