शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

टाळेबंदीचे निर्बंध उठविल्यानंतर सोलापुरात नवीन रुग्णांच्या संख्येत पडतेय भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 09:26 IST

सारीने बाधित रुग्ण वाढले; सर्वांनी काळजी घ्यावी, प्रशासनाने केले आवाहन

ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

सोलापूर : टाळेबंदीचे निर्बंध उठविल्यानंतर सोलापुरातील सर्व व्यवहार सुरळीत होत असतानाच सर्वांना चिंता करायला लावणारी बाब पुढे येत आहे. मंगळवारी शहरात आढळलेल्या ४७ रुग्णांपैकी ४३ रुग्ण नव्याने आढळले आहेत. संपकातून बाधा झालेले फक्त चारच रुग्ण आहेत. 

सोलापुरात अत्यावश्यक सेवा वगळता आता इतर दुकाने खुली करण्यात आली आहेत. नागरिकांनाही काम व खरेदीसाठी सायंकाळी पाचपर्यंत मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. त्याचप्रमाणे एकल दुकाने उघडण्यास परवानगी असल्याने व्यापारीपेठांमध्ये दुकानात खरेदीसाठी गर्दी होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. व्यापारी बाजारपेठ खुली करताना प्रशासनाने फिजीकल डिस्टन, मास्क व सॅनीटायरझरचा वापर अनिवार्य केला आहे. तरीही गर्दीच्या ठिकाणी जाताना दक्ष रहा. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारी जो अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्यामध्ये सारीची लागण झालेले ४३ नवीन रुग्ण आहेत. यापूर्वीच्या प्रतिबंधीत क्षेत्राबरोबर शहरातील गावठाण आणि हद्दवाढ भागातील लोकांना लागण झाल्याचे दिसून येत आहे. होटगी व विजापूररोडवरील नगरात राहणाºया नागरिकांना बाधा झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोरोणापासून बचाव करण्यासाठी गरज असेल तर घराबाहेर पडा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे. तसेच कोरोणा रुग्ण आढळलेल्या ठिकाणी नागरिकांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी व ज्येष्ठांचा सर्व्हे करण्यासाठी इच्छुकांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

शहरात आढळलेले रुग्णमंगळवारी शहरात आढळलेले रुग्ण पुढील ठिकाणचे आहेत. विश्वकर्मा अपार्टमेंट, होटगीरोड: १, तेलंगी पाच्छापेठ: १, न्यू पाच्छापेठ: ५, लक्ष्मी नगरसिंह झोपडपट्टी: १, बेगमपेठ: १, घोंगडेवस्ती: १, सोमवारपेठ: १, भवानीपेठ: ६, मंत्रीचंडकनगर: २, शिवसेना कार्यालय, शुक्रवारपेठ: १, सुशीलनगर: १, दक्षिण कसबा: ३, जुनी पोलीस लाईन:१, रेल्वे लाईन: १, राजेंद्र चौक: २, मार्कंडेयनगर: १, इंदिरानगर:१, शनिवारपेठ:१, रविवारपेठ:१, उत्तर कसबा:१, बागेवाडीकर हॉस्पीटल:१, वसंतविहार:१, कस्तुरबा गांधीनगर:१, न्यू संजयनगर:१, ढोरगल्ली: २, मड्डीवस्ती: १, विनायकनगर:१, अशोक चौक: १, आदित्यनगर:१, बेघर हौसिंग सोसायटी: १, धरमशीलाईन: १, विश्वकरण संकुल, होटगीरोड:१.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका