शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

एनयुएचएम घोटाळा :गाडी भाड्याने लावण्यासाठी गुडेवार यांची मारली बोगस सही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:58 IST

सोलापूर : महापालिकांतर्गत असलेल्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एनयुएचएम) कार्यालयासाठी गाडी भाड्याने लावण्यासाठी मंजुरी घेण्यात  आलेल्या पत्रावर चक्क तत्कालीन ...

ठळक मुद्देपुणे विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी याबाबत आरोग्य संचालकांकडे केलेल्या तक्रारआरोग्य अभियानाच्या कार्यालयासाठी भाड्याने लावण्यात आलेल्या  गाडीचा विषय तत्कालीन आयुक्त गुडेवार यांनी आरोग्य संचालकांकडे केलेल्या तक्रारीवरून वेगळेच प्रकरण बाहेर

सोलापूर : महापालिकांतर्गत असलेल्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एनयुएचएम) कार्यालयासाठी गाडी भाड्याने लावण्यासाठी मंजुरी घेण्यात  आलेल्या पत्रावर चक्क तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची  बोगस सही मारण्यात आली  आहे. 

पुणे विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी याबाबत आरोग्य संचालकांकडे केलेल्या तक्रारीनंतर  हा प्रकार उघड झाला आहे. शहरी आरोग्य अभियानाच्या कार्यालयासाठी भाड्याने लावण्यात आलेल्या  गाडीचा विषय यापूर्वीच वादग्रस्त ठरला आहे. या प्रकरणाची चौकशी झाली व त्या अनुषंगाने यासंबंधी असलेल्या दोघा महिला डॉक्टरांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या गाडीसाठी अदा करण्यात आलेले  भाडे संबंधित डॉक्टरांकडून वसूल करण्याचे आदेश झाले आहेत असे असताना आता तत्कालीन आयुक्त गुडेवार यांनी आरोग्य संचालकांकडे केलेल्या तक्रारीवरून वेगळेच प्रकरण बाहेर आले आहे. 

गाडी भाड्याने लावण्यासाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर करण्यात आलेली सही माझी नसून कोणीतरी बोगस सही मारल्याचे गुडेवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच गंभीर बनले आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यालयाच्या कामासाठी भाड्याने वाहन उपलब्ध करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. निविदेद्वारे हे वाहन उपलब्ध करावे तत्कालीन आरोग्य अधिकाºयांनी १६ जून २0१४ रोजी आयुक्तांकडे एक प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला. 

या प्रस्तावात या कार्यालयासाठी भाड्याने घेण्यात आलेल्या गाडीसाठी बजेट तरतुदीप्रमाणे मागील वर्षाप्रमाणेच भाडे मंजूर करावे. जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर २0१४ या तीन महिन्यांसाठी ७५ हजार भाडे अदा करण्यास कार्योत्तर मान्यतेचा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर २१ जून २0१४ रोजी स्वाक्षरी केली आणि त्याच तत्कालीन आयुक्त गुडेवार  यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याची सही आहे. ही सही मी केलीच नाही, असे गुडेवार यांनी तक्रारीत नमूद केल्यामुळे या प्रकरणाचे गौडबंगाल वाढले आहे. 

मास्टर माइंड कोण ?बोगस क्रमांकाची आरोग्य विभागाची गाडी अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर तत्कालीन आयुक्त विजयकुमार काळम यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यात हा प्रकार उघडकीला आला. आरोग्य अधिकाºयांनी संगनमत करून बोगस प्रस्तावाद्वारे गाडीभाडे लाटल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित भाडे वसुलीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आता तत्कालीन आयुक्त गुडेवार यांची सही बोगस असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य संचालक काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाHealthआरोग्य